बुधवारी (६ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत ५२ वा सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ धावांनी पराभूत केले. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करत असलेल्या जम्मू काश्मीरच्या उमरान मलिकने आपलाच जुना विक्रम मोडून, नवीन विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा २१ वर्षीय गोलंदाज उमरान मलिकने वेगवान गोलंदाजी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वात जलद चेंडू टाकण्याचा पराक्रम केला होता. त्याने या सामन्यात १५०.६ किमी दर ताशी गतीचा चेंडू टाकला होता.
उमरान मालिकने रचला इतिहास
त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळताना जेव्हा तो गोलंदाजीला आला त्यावेळी सर्वच क्रिकेट चाहते त्याची वेगवान गोलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक होते. या सामन्यात केएस भरतला बाद करत त्याने आयपीएल स्पर्धेतील खाते उघडले. तसेच ९ व्या षटकात त्याने एका पाठोपाठ ५ चेंडू त्याने १५० पेक्षा अधिक गतीने टाकले, ज्यामध्ये १५३ किमी दर ताशी गतीचा चेंडू टाकताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो आयपीएल २०२१ च्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे.
He just keeps getting better and better with his pace 😮
Umran Malik 🔥🔥#IPL2021 #UmranMalik #RCBvSRH pic.twitter.com/O6O8V06aiU
— Sportz Point (@sportz_point) October 6, 2021
Umran malik on 🔥🔥 153+ #UmranMalik #SRHvRCB #IPL2021 pic.twitter.com/vbYRvjQKT9
— खेळ Mahiti (@Mahiti11) October 6, 2021
सनरायझर्स हैदराबाद संघाचा विजय
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयने ४४ धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर ७ बाद १४१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ४१ तर ग्लेन मॅक्सवेलने ४० धावांचे योगदान दिले. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना या धावा करता आल्या नाही. शेवटी या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाची तिशी ओलांडल्यानंतरही हर्षलचा दरारा कायम! ‘या’ बड्या विक्रमात चेन्नई, मुंबईकरांवरही ठरलाय सरस
रोहितमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, बड्या क्रिकेटरची केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ होतोय व्हायरल
हर्षलच्या गोलंदाजीपुढे सनरायझर्सच्या फलंदाजांचा ‘गरबा’, बुमराहलाही ओव्हरटेक करत बनला नंबर १