---Advertisement---

उमरान मलिक न्यूझीलंडमध्ये आपल्या वेगाने कहर करायला सज्ज, फिटनेस व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, नोव्हेंबर 12, 2022 2:02 PM
Umran-Malik-Hardik-Pandya
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup)2022मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून युवा गोलंदाज उमरान मलिक याला दोन्ही संघात स्थान दिले गेले आहे. या दौऱ्यात भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या, तर वनडेचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे.

भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) सध्या खूपच चर्चेत आहे. आयसीसी टी20विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. 169 लक्ष्य देऊनसुद्धा भारताच्या एकाही गोलंदाजाने विकेट घेतली नाही. हा सामना झाल्यानंतर उमरान चर्चेत आला.

उमरानने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतो. त्याव्यतिरक्त तो आता न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या दोन्ही संघाचा भाग झाला आहे.

उमरानने भारताच्या टी20 संघात पदार्पण केले असून त्याने तीन सामने देखील खेळले आहेत. यामध्ये त्याने 12.44च्या इकॉनॉमी रेटने धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याचा वेगच हा सर्वात उल्लेखनीय आहे. तो लागोपाठ 150 किमी वेगाने गोलंदाजी करतो. माजी क्रिकेटपटूंनी त्याचा वेग पाहून म्हटले, ‘तो जसजसा खेळत जाईल तसतशी त्याची गोलंदाजी अधिक उत्तम होत जाईल.’

उमरानने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावरून तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसून सराव करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये 17 सामने खेळले असून त्यामध्ये 8.83च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट्स घेतल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CkvZa_PBm3S/?utm_source=ig_web_copy_link

उजव्या हाताच्या या गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हवे तसे झाले नाही. त्याने आर्यलंडच्या दौऱ्यात एक षटक टाकताना 14 धावा दिल्या होत्या. तसेच त्याला त्यानंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या टी20 मालिकेतही घेतले होते. त्याने 4 षटके टाकताना 56 धावा देत सलामीवीर जेसन रॉय याची विकेट घेतली होती.

उमरान 2022च्या आयपीएलमधील एका सामन्यात 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत चर्चेत आला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोलार्ड आणि मुंबई इंडियन्सचे नाते संपुष्टात? 13 वर्षांनंतर सोडणार संघाची साथ
बाबर आझमची इंग्लंडविरुद्धच्या फायनलपूर्वी गर्जना, सांगितला ‘गेमप्लॅन’!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---