आयपीएलमधून भारतीय संघाला भविष्यासाठी एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मिळाला आहे. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून उमरान मलिक आहे. आयपीएल २०२२ मध्ये उमरानने १५० किमी ताशी गतीने निरंतर गोलंदाजी केली आहे. अशात चाहते आणि क्रिकेटचे जाणकार उमरानला शोएब अख्तरच्या सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानत आहेत. पण आता उमरानने स्पष्ट केले की, सध्यातरी त्याच्या डोक्यात असा कसलाही विचार नाहीये.
आयपीएल २०२२ मध्ये उमरान मलिक (Umran Malik) याने सनरायझर्स हैदराबादसाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले. हंगामातील १४ सामन्यांमध्ये त्याने २२ विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. उमरानने एका सामन्यात तब्बल १५७ किमी ताशी गतीने चेंडू टाकला, जो हंगामातील दुसरा सर्वत वेगवान चेंडू ठरला. दक्षिण आफ्रिकी दिग्गज एन्रीच नॉर्कियाने अंतिम सामन्यात १५७.३ किमी ताशी गतीने चेंडू टाकला आणि तो हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला.
असे असले तरी, उमराचे प्रदर्शन पाहून निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडले आहे. या मालिकेत त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेविषयी बोलताना उमरान मलिकने त्याची टी-२० मालिकेतील स्वतःची रणनीती सांगितली. त्याने स्पष्ट केले की, त्याचे लक्ष शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा विक्रम मोडण्यावर नसेल. तो म्हणाला की, सध्या त्याले लक्ष शोएब अख्तरचा विक्रम मोडण्याकडे नाही, तर स्वतःच्या संघासाठी चांगले प्रदर्शन करण्यावर आहे. त्याने असेही सांगितले की, सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी तो संघाला मदत करू इच्छितो.
दरम्यान, पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू (ताशी गती १६१ किमी) टाकला होता. अख्तरचा हा विक्रम मोडणारा एकही गोलंदाज अद्याप मिळालेला नाहीये. अशात चाहते उमरानकडून खूप अपेक्षा लावून बसले आहेत. उमरान मलिक मुळचा जम्मू कश्मीरचा आहे. मागच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल पदार्पणाची संधी दिली. त्याचे प्रदर्शन पाहून हैदराबादने त्याला यावर्षी मेगा लिलावापूर्वी रिटेन केले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्याच्या प्रदर्शनात खूप सुधारणा पाहायला मिळाली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
‘सावधान, आम्ही येतोय!’ मालिकेपूर्वी वेस्टइंडिजच्या कर्णधाराचा पाकिस्तान संघाला इशारा
हे फक्त माहीच करू शकतो! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धोनीचा पुढाकार, लढवली भन्नाट शक्कल