मुळचा जम्मू आणि काश्मीरचा असणाऱ्या उमरान मलिक याने (Umran Malik) आयपीएलच्या १५व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असताना आपली चमक दाखवली आहे. उमरानने यंदाच्या हंगामात १५७ च्या गतीने चेंडू टाकत आपल्या गुणांचे प्रदर्शन केले. तसेच त्याने या हंगामात सातत्याने वेगवान चेंडू टाकत सर्वांना प्रभावित केले. त्यामुळेच उमरान मलिक याची भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
उमरान मलिक याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर अनेकांकडून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. उमरानने मात्र माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याने शेअर केलेली पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करत आभार व्यक्त केले. इरफान पठाण गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू आणि काश्मीर संघाचा प्रशिक्षक आहे. इरफानमुळे क्रिकेट विश्वात उमरान मलिक आणि अब्दुल समद सारख्या गेलंदाजांना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे.
उमरानची भारतीय संघात निवड झाल्यानंतर इरफानने त्याच्या आणि अब्दुल सामदबरोबर आनंदही साजरा केला. याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि भारताचे माजी मंत्री राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी पोस्ट शेअर करत उमरान मलिकचे अभिनंदन केले. सोबतचं उमरानला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी इरफान पठाणचे आभार मानले. या पोस्टवर प्रतिक्रिया देत इरफानने भविष्यात आणखी खेळाडू उमरानकडून प्रेरणा घेत भारतीय संघासाठी विशेष कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली आहे.
Thank you sir ji. I’m sure many more kids will take inspiration from umran and one day represent our country.
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 22, 2022
दरम्यान, ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच टी२० सामने खेळले जाणार आहेत. यासाठी केएल राहुल कर्णधार, तर रिषभ पंत उपकर्णधार पदाची भुमिका सांभाळतील. याशिवाय ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), दिपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची संघात निवड करण्यात आली आहे.
शिवाय रोहित शर्मा, विराट कोहली आणि जस्प्रित बुमराह यारख्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या आयपीएल हंगामात आम्ही सातत्याने…’, पंजाबच्या अपयशानंतर कर्णधार मयांकची प्रामाणिक कबुली
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट