---Advertisement---

उमरानचा बॉल गोळीसारखा आला अन् शाकिबचं हेल्मेट तोडून गेला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

On: बुधवार, डिसेंबर 7, 2022 3:09 PM
Shakib al Hasan Helmet broken
---Advertisement---

भारत आणि बांगलादेेश या संघात दुसरा सामना ढाका येेथील शेर-ए-बांगला स्टेडीयम येथे खेळवला गेला. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. संघाचे दोन फलंदाज 20 धावांच्या आतच तंबूत परतले. तसेेच भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज बांगलादेशच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले. बांगलादेशच्या शाकिब अल हसन याला भारताच्या वेगवान गोलंदाजीचा चांगलाच अनुभव आला.

बांगलादेश संघ फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर भारताच्या गोलंदाजांनी चांगलीच दहशत निर्माण केली. सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यासमोर गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आला. त्यानंतर त्याला उमरान मलिक (Umran Malik) याच्या वेगवान चेंडूंचा सामना करावा लागला. या दोघे शाकिब अल हसन याच्यासाठी डोकेदुखी ठरले. उमरानने आपल्या 5व्या षटकात शाकिबला दोन वेळा मात दिली. पहिल्यावेळी त्याचा चेंडू शाकिबच्या हेल्मेटवर जाऊन आदळला, दुसऱ्यावेळी चेंडू त्याच्या बरगडीत लागला. एवढेच नव्हे तर, गोलंदाजीसाठी आलेल्या उमरान मलिकचा वेगवान चेंडूदेखील या अष्टपैलू खेळाडूला दिसला नाही. त्याने जवळपास 150 किमी/तास या वेगाने फेकलेला चेंडू शाकिबच्या हेल्मेटवर जाऊन आदळला, ज्यामुळे शाकिबचे हेल्मेट तुटले. मात्र, मोठा अपघात टळला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात शाकिबने केला होता कहर
बांगलादेशच्या शाकिबने पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाला अडचणीत टाकले होते. त्यांने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले होते. बांगलादेशने या रोमहर्षक सामन्यात एका विकेेटने विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघ अडचणीत सापडला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने आपले 69 धावांवरच 6 गडी गमावले होतेे. मात्र, नंतर फलंदाजीसाठी आलेल्या मेहेदी हसन (Mehidy Hasan) आणि मेहमदुल्लाह (Mehmadullah) यांनी संघाला सुस्थितीत आणले. या दोघांनी आपल्या संघासाठी अर्धशतके झळकावली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा व्हिसा भारताकडून मंजूर, ब्लाईंड टी20 विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा
कॅच घेताना रोहित जखमी! झेल तर सुटलाच, पण बोटातून निघाले रक्त; टाके पडण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---