पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात नुकताच दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ५१० धावांचा डोंगर उभारला होता. तर झिम्बाब्वे संघाला १३२ धावा करण्यात यश आले होते. ३७८ धावांनी पुढे असलेल्या पाकिस्तान संघाने झिम्बाब्वे संघाला फॉलोऑन दिला होता. सध्या झिम्बाब्वे संघ ९ बाद २२० धावांवर खेळत आहे.
पाकिस्तान संघाकडून पहिल्या डावात एकीकडे हसन अलीने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या २७ धावा देत ५ गडी बाद केले होते. तर दुसरीकडे अजहर अलीने एक अप्रतिम झेल टिपला होता. जे पाहून त्याचे संघ सहकारीही आश्चर्यचकित झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, या सामन्यातील तिसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघ फलंदाजी करत असताना हसन अलीने टाकलेल्या चेंडूवर रॉय कायाने कट शॉट खेळला होता. जो अतिशय वेगाने गलीच्या दिशेने गेला होता. गलीच्या ठिकाणी अजहर अली क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा होता. डोळ्याची पापणी झाकून उडण्याआधी (अतिशय वेगाने) त्याने तो झेल टिपला होता. तो झेल पाहून फलंदाजच नव्हे तर संघ सहकारी इमरान बट देखील आश्चर्यचकित झाला होता.
What a stunner at gully by @AzharAli_ 👏🏼👏🏼#PAKvZIM #PAKvsZIM pic.twitter.com/OK4eeV6ceT
— CRICKETEER UPDATES 🎉🎊🏏 (@786_naqi) May 9, 2021
इतकेच नव्हे तर, स्वतः अजहर अलीलादेखील विश्वास होत नव्हता की, त्याने तो झेल टिपला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा चेंडू टिपल्यानंतर अजहर अली काहीवेळ स्तब्ध झाला होता. तो डोक्याला हात लावून मैदानावर बसला होता. त्यानंतर त्याने संघ सहकाऱ्यांसोबत मिळून या अद्भुत झेलचा जल्लोष साजरा केला.
Another day, another five-for for Hassan Ali. What a catch that was. Azhar Ali took a blinder outta nowhere. Loved the way all teammates appreciated him on that catch. Imran Butt couldn't belive that Azhar actually took that one 😂#PAKvZIMhttps://t.co/JpwQbXednq
— Daniyal Mirza (@Danitweets___) May 9, 2021
https://twitter.com/taimoorze/status/1391324850669641730?s=20
A 5-wicket haul for Hasan Ali in three consecutive Tests. First Pakistan fast bowler to do it since Shoaib Akhtar in 2004. #ZimvPak
— Mazher Arshad (@MazherArshad) May 9, 2021
यासोबतच हसन अलीने ५ गडी बाद करताच एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. २००४ नंतर पहिल्यांदा असे झाले आहे की, पाकिस्तानी गोलंदाजाने सलग ३ कसोटी सामन्यात ३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा कारनामा यापूर्वी शोएब अख्तरने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भर सामन्यात भिडले पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे खेळाडू, पूर्ण १ षटक चालला विवाद; बघा व्हिडिओ
दु:खद! मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाचे वडिल कालवश, काही दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण