लीड्स। १ जूनपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील दुसऱ्या कसोटीसाठी सॅम करन या १९ वर्षीय खेळाडूचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने सॅम करनची निवड करण्यात आली आहे. याबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने बुधवारी माहिती दिली.
स्टोक्सला क्षेत्ररक्षणाचा सराव करताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. पण अजूनही तो दुसऱ्या कसोटीसाठी संघामधून बाहेर पडलेला नाही.
सॅम करन हा स्विंग गोलंदाज असून त्याचा याआधी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या तिरंगी टी २० मालिकेसाठी इंग्लंड संघात निवड झाली होती. परंतु त्याला एकही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. तसेच त्याचा भाऊ टॉम करनही काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंड संघाकडून दोन कसोटीत खेळला होता.
इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने ९ विकेट्सने पराभूत करून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा वेगवान अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने दुसऱ्या कसोटीत इंग्लंड चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–संपुर्ण यादी- दुपारच्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये लागल्या या खेळाडूंवर बोली
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू






