भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणतात की भारतीय संघाच्या मधल्या फळीत सुरेश रैना किंवा युवराज सिंग यांना संधी द्यायला हवी. त्यांनी हा मुद्दा भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजांच्या कमतरतेमुळे केला आहे.
गावसकर म्हणतात, ” सध्या भारतीय संघ मधल्या फळीत चाचपडताना दिसत आहे. शिखर धवननंतर संघात कोणताही डावखुरा फलंदाज नाही. त्यामुळे मधली फळी भक्कम करण्यासाठी या दोघांपैकी एका कुणालातरी संधी द्यायला हवी. हा जरी तात्पुरता उपाय असला तरी याची सध्या गरज आहे. विशेष म्हणजे रैना किंवा युवराज गोलंदाजीही करू शकतात. ”
सध्या भारतीय संघाची मधली फळी त्यातही चौथ्या क्रमकांचा फलंदाज कोलमडताना दिसत आहे. गेले अनेक दिवस या जागेसाठी भारताला एकही कायमस्वरूपी खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे सुनील गावसकर यांनी केलेल्या या व्यक्तव्याला महत्व आले आहे.