पुणे । पीवायसी हिंदु जिमखाना क्लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट क्लब संघाने डेक्कन जिमखाना संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाला घरच्या मैदानावर हार पत्करावी लागली. युनायटेड क्रिकेट क्लब संघाने पहिल्यांदा खेळताना ओमकार काळेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 45 षटकात 8 बाद 172 धावा केल्या. यात श्रीयश यादवने 25 व परम अभ्युदयने 27 धावा करून ओमकारला सुरेख साथ दिली.
172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अदित्य श्रीकृष्णनच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघ 45 षटकात 9 बाद 120 धावांत गारद झाला. अथर्व सनसच्या 45 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. 28 धावांत 4 गडी बाद करणारा अदित्य श्रीकृष्णन सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सव्स्तर निकाल- साखळी फेरी
युनायटेड क्रिकेट क्लब- 45 षटकात 8 बाद 172 धावा(ओमकार काळे 54, श्रीयश यादव 25, परम अभ्युदय 27, शिव हरपळे 17, रणवीर सिंग चौहाण 13, देवराज बेद्रे 2-20, अथर्व सनस 2-20, वेदांत सनस 2-28, सत्यम शिंदे 2-15) वि.वि डेक्कन जिमखाना- 45 षटकात 9 बाद 120 धावा(अथर्व सनस 45, अदित्य श्रीकृष्णन 4-28, यश जमगे 2-18, शिव हरपळे 2-18, माहिर रावळ 1-25) सामनावीर- अदित्य श्रीकृष्णन
युनायटेड क्रिकेट क्लब संघाने 52 धावांनी सामना जिंकला.