भारतीय संघाला २०१२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून देणाऱ्या उन्मुक्त चंद आता आमेरिकेच्या मायनर क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. तेथे त्याने चांगल्या फलंदाजीला सुरुवात केली आहे. त्याने मायनर लीगमध्ये आणखी एक अर्धशतक केले आहे. या स्पर्धेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक आहे.
त्याने त्याच्या या खेळीचा एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. तो या व्हिडिओत त्याच्या चांगल्या फार्ममध्ये दिसत आहे आणि एक दमदार शाॅट खेळत आहे. त्याने हे अर्धशतक केल्यानंतर देवाचे आभार मानले आहेत.
त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट केले आहे की, “सर्व वेळी माझा हात धरण्यासाठी ईश्वराचे मनापासून आभार.” चंदने ट्विटरवर ४५ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसत आहे. चंदने अमेरिकेत मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत सिलिकाॅन वॅली स्ट्रायकर्स संघासोबत करार केला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तो एकही धाव न करता बाद झाला होता. पण, त्यानंतर त्याने स्पर्धेत दोन अर्धशतक केले आहेत.
Sincere gratitude to the almighty for holding my hand throughout. #Gratitude #halfcentury@MiLCricket @usacricket @Sling @Toyota pic.twitter.com/YneCVd2EMG
— Unmukt Chand (@UnmuktChand9) August 29, 2021
उन्मुक्त चंदने त्याच्या नेतृत्वात २०१२ मध्ये भारतीय संघाला १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता संघ बनवले होते. त्याने नजीकच्या काळातच एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मागचे काही वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. शेवटच्या मालिकेत मला दिल्लीसाठी एकही सामना खेळायला भेटला नाही आणि त्याच्यानंतरही तीच चिंता, मला पुढचा सामना खेळायला मिळेल की नाही.
तो पुढे बोलताना म्हणाला, “भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये यावेळी खूप चिंता आहेत. तर, मला त्याच गोष्टींमधून पुन्हा जायचे नव्हते. स्वत:ला संघातून बाहेर बसलेले पाहायचे आणि अशा खेळाडूंना खेळताना पाहणे, ज्यांना मी माझ्या क्लब संघातही घेणार नाही. हा माझ्यासाठी मानसिक त्रास होता. मला या सगळ्या गोष्टींमध्ये माझा वेळ खराब करायचा नव्हता.”