प्रो कबड्डीमध्ये काल तेलुगू टायटन्स आणि यु.पी.योद्धा संघात सामना झाला. या सामन्यात यु.पी.योद्धा संघाने ३९-३२ असा विजय मिळवला. यु.पी.योद्धा संघासाठी नितीन तोमर, रिशांक देवाडीगा आणि राकेश नरवाल यांनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. तेलुगू टायटन्ससाठी विशाल भारद्वाराज आणि राहुल चौधरी यांनी चांगली कामगिरी केली मात्र तेलुगू संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले.
पहिल्या सत्रात दोन्ही संघाने संयमी खेळ केला. दोन्ही संघ डु ऑर डाय रेडवर गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सातव्या मिनिटाला दोन्ही संघ ५-५ अश्या बरोबरीत होते. १४व्या मिनिटाला दोन्ही संघ ११-११ अश्या बरोबरीत होता. पहिले सत्र संपले तेव्हा यु.पी.संघ १४-१३ अश्या एक गुणांच्या आघाडीवर होता. यु.पी.साठी नितीन तोमर आणि रिशांक गुण मिळवत होते. तर तेलगूसाठी राहुल गुण मिळवत होता.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सहाव्या मिनिटाला २०-२० अश्या बरोबरीत दोन्ही संघ होते. तर १०व्या मिनिटाला २५-२५ अश्या बरोबरीवर येऊन सामना ठेपला होता. त्यानंतर युपीचा कर्णधार नितीन तोमरने एक सुपर रेड करत सामन्याचे चित्र बदलले. नितीनने सामन्यातील पकड कमी होऊ दिली नाही. शेवटच्या ५ मिनिटात सामना पूर्णपणे यु.पी. संघाच्या बाजूने झुकला होता. पण राहुल चौधरी जिंकण्याचे प्रयन्त करत होता. त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.हा सामना शेवटी ३९-३२ असा यु.पी संघाने जिंकला.
या सामन्यात राहुल चोधरी आणि नितीन तोमर या खेळाडूंनी सुपर टेन मिळवला तर रिशांकने ६ रेडींग गुण मिळवत ३०० रेडींग गुणांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रिशांक सहावा खेळाडू ठरला आहे. तर राजेश नरवानले मागील सामन्यातील अपयश धुवून काढत या संयत उत्तम ऑलराऊंडर खेळाचे प्रदर्शन केले.