आज प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा सोळावा सामना बंगाल वोरीयर्स आणि यू पी योद्धाज यांच्यात होणार आहे. यू पीच्या संघाचे नेतृत्व या मोसमातील सर्वात महागड खेळाडू म्हणजेच नितीन तोमर करत आहे तर बंगालच्या संघाचे नेतृत्व सुरजीत सिंगकडे आहे. बंगालने आपल्या मागील सामन्यात तेलगू संघाला पछाडले होते तर यू पी योद्धाजने बंगळुरूला मात देऊन या सामन्यात प्रवेश केला आहे.
बंगाल वॉरियर्सच्या संघाचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. मागील सामन्याप्रमाणेच बंगालला त्याच्या रेडर्सकडून म्हणजेच जंग कुंग ली आणि मणिंदरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल तर डिफेन्सची जबाबदारी सुरजीतच्या खांद्यावर असेल.
तर दुसऱ्या बाजूला यू पी योद्धाजचा संघ जरी या मोसमात नवीन आला असला तरी मागील दोन्ही सामन्यात त्यांनी सांघिक खेळ करून सामने जिंकले आहेत. त्याचा कर्णधार नितीन तोमर हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे तर त्याला रिशांक देवाडिगा चांगली साथ देत आहे.
संभाव्य संघ:
यू पी योद्धाज
१ नितीन तोमर
२ रिशांक देवाडिगा
३ महेश गौड
४ जीवा कुमार
५ हाडी ताजीक
६ नितेश कुमार
७ राजेश नरवाल
बंगाल वॉरियर्स
१ जाँग कुन ली
२ मनिंदर सिंग
३ दीपक नरवाल
४ भूपिंदर सिंग
५ रण सिंग
६ श्रीकांत वानखेडे
७ सुरजीत सिंग