अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण असताना एक सकारात्मक बातमी येत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. दोन्ही देशांमधील ही एकदिवसीय मालिका श्रीलंकेच्या हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर आयोजित केली जाणार आहे. याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे.
अफगाणिस्तानमधील राजकीय उलथापालथ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पीसीबीमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना या मालिकेबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे, “तालिबानी अधिकाऱ्यांनी मालिकेला हिरवा कंदील दाखवल्याने ही मालिका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आम्ही आमच्या ठरवलेल्या नियोजनानुसार जात आहोत. 24 ऑगस्टला वेस्ट इंडीजविरुद्धची दुसरी कसोटी संपल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी आम्ही आमचा संघ घोषित करणार आहोत.”
अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी काबूलमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे. तर पीसीबीने मालिकेसाठी 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान लाहोरमध्ये प्रशिक्षण शिबिर जाहीर केले आहे. पाकिस्तानी संघ 29 ऑगस्टला श्रीलंकेसाठी रवाना होईल. अफगाणिस्तानात सत्ता बदलल्यानंतर तालिबानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा मवाळ दाखवण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या मालिकेत तालिबान सकारात्मक भूमिका घेईल असे दिसत आहे.
एका विश्लेषकाच्या मते, “तालिबान ही मालिका सुरू ठेवेल. कारण पाश्चिमात्य देशांना हे दाखवण्याची चांगली संधी असेल की ते त्यांच्या आधी अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्यापेक्षा वेगळे आहेत. अफगाणिस्तानचे बहुतेक सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत. नव्याने सुरू झालेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. ज्यात रeशीद खान, मुजीब उर रहमान यांचाही समावेश आहे.
प्रथमच या दोन आशियाई देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संघ समोरा-समोर असतील. त्यामुळे या मालिकेकडे क्रिकेट वर्तुळातचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास
अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी राशिद खान झाला भावुक, देशवासियांना दिला ‘असा’ संदेशa






