आगामी आशिया चषक 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. आशिया चषकासाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. संघातील काही वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने तसेच, युवा खेळाडू आयर्लंडमध्ये असल्याने काही दिवसांचा अवधी घेत ही संघनिवड लांबणीवर टाकण्याचा निवड समितीचा प्रयत्न होता. मात्र, आता या निवडीला मुहूर्त मिळाला असून, 21 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषकासाठी भारतीय संघाची संघ निवड 21 ऑगस्ट रोजी होईल. विशेष म्हणजे निवड समितीच्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा स्वतः हजर असेल.
आशिया चषक स्पर्धेसाठी केएल राहुल पूर्णता तंदुरुस्त असल्याचे समजते आहे. त्यामुळे त्याची संघात निवड नक्की मानली जाते. राहुल तंदुरुस्त असल्याने संजू सॅमसन याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा दुखापतग्रस्त खेळाडू श्रेयस अय्यर हा देखील फिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्याबाबत निवड समिती व संघ व्यवस्थापन घाई न करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते. त्याची निवड न झाल्यास चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव याचे नाव आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज दौऱ्यावर टी20 मालिकेत दर्जेदार कामगिरी केलेल्या तिलक वर्मा याच्या विषयी देखील चर्चा केली जाईल.
यंदा आशिया चषक श्रीलंका व पाकिस्तानात 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळला जाणार आहे. भारतीय संघाने 2018 मध्ये आशिया चषक आपल्या नावे केला होता. मागील वर्षी झालेल्या टी20 प्रकाराच्या आशिया चषकात श्रीलंकेने बाजी मारलेली.
(Updates On Team India Asia Cup Selection KL Rahul Fit Rohit Will Attend Meeting)
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे कमबॅक फसले! दुखापतीमुळे बराच काळ राहणार बाहेर
BREAKING: वर्ल्डकपआधीच ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का! दोन हुकमी एक्के जखमी