भारतीय संघाची टी-२० विश्वचषकातील सुरुवात खूपच खराब झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो भारत पाकिस्तान सामना रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पर पडला. या सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांसह बॉलीवुड मधील काही सुप्रसिद्ध चेहरेही दिसले. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला रिषभ पंतसाठी चीअर करताना दिसली. यानंतर पुन्हा एकदा तिचे आणि पंतचे नाव एकत्र जोडले जात आहे.
भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. संघाच्या अवघ्या सहा धावा असताना दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत भारताचा डाव सांभाळला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्याचे काम केले, पण तरीही संघ सामन्यात विजय मिळवू शकला नाही. रिषभ पंतने फलंदाजी करताना सुरुवातीला सावध पवित्रा स्वीकारला होता, पण नंतर त्याने हसन अलीच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन षटकार मारले.
अशातच रिषभ पंतच्या फलंदाजी दरम्यान उर्वशी त्याच्यासाठी प्रोत्साहन देताना पाहायला मिळाली. ती स्टेडियमच्या स्टँड्समधून सामन्यांचा आनंद घेत होती आणि पंतसाठी टाळ्याही वाजवत होती. उर्वशीने यावेळी तिच्या हातात भारताचा झेंडा घेतला होता आणि ती त्या झेंड्याला हवेत फडकवत होती.
उर्वशीला स्टँड्समध्ये पाहून चाहते सोशल मीडियावर एक्टिव झाले आणि पंतसोबत तिचे नाव पुन्हा एकदा जोडू लागले आहेत. यापूर्वीही अनेकदा उर्वशी आणि पंत एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
Full support to @RishabhPant17. @UrvashiRautela 😍😍 pic.twitter.com/6mXJUhIrb8
— Pranav Pawar (@PranavP43166839) October 24, 2021
First Female Woman youngest Most Beautiful IITian Actress to see india losing in the ICC WC to Pakistan in the Universe.#UrvashiRautela pic.twitter.com/0XvdOx3xIZ
— ᴠɪᴄᴋʏᴘᴇᴅɪᴀ 🍥 (@vishwajitrules) October 24, 2021
Urvashi Rautela after Rishabh Pant's wicket 😌 –
Give the Man of the Match to the cameraman already 😂!!!#INDvPAK pic.twitter.com/KubiLRQJiP
— DC బానిస 🫨💙🛐 (@Borekottestabro) October 24, 2021
Urvashi Rautela cheering after a four by Rishabh Pant. Kaafi wholesome. 😂 pic.twitter.com/xqaArgfveu
— Chinmayee(chokhul era) (@FlickedForSix) October 24, 2021
https://twitter.com/DarkKnightRised/status/1452287598605504536
दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मर्यादीत २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने सहज विजय मिळवला. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता आणि १३ चेंडू शिल्लक ठेऊन सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
लज्जास्पद! भारताच्या पराभवानंतर शमीवर धार्मिक टीका; सहकारी उतरले समर्थनात