---Advertisement---

आज अमेरिकन ओपनला मिळणार नवा विजेता; थीम-झ्वेरेवमध्ये रंगणार फायनल

On: रविवार, सप्टेंबर 13, 2020 2:43 PM
---Advertisement---

न्यूयॉर्क। दोन सेटमध्ये पिछाडीवर असताना अलेक्झांडर झ्वेरेवने शानदार पुनरागमन करत, पाब्लो कारेनो बुस्टाचा पराभव करून अमेरिकन ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा अंतिम सामना आता डॉमनिक थीमशी होईल.

जर्मनीचा 23 वर्षीय टेनिस स्टार झ्वेरेव पहिल्या दोन सेटमध्ये फॉर्ममध्ये आढळला नाही, तरीही त्याने तिसऱ्या सेटपासून शानदार पुनरागमन करत पाब्लोला 3-6, 2-6, 6-3, 6-4, 6 -3 ने पराभूत केले.

या विजयानंतर ज्वेरेव म्हणाला, “दोन सेट गमावल्यानंतर सहसा खेळाडू हार मानतात, पण मी सामन्यात कायम राहिलो. तुलना करणे सोपे नसते आणि कधीकधी संयमाचीही परीक्षा असते.”

झ्वेरेव प्रमाणेच ९ वर्षांपूर्वी नोवाक जोकोविचने रॉजर फेडरर विरुद्ध युएस ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये पहिले २ सेट गमावल्यानंतर असेच पुनरागमन केले होते. तसेच झ्वेरेव हा गेल्या दहा वर्षांत ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडूही आहे. तो सध्या २३ वर्षांचा आहे. याआधी २३ व्या वर्षी २०१० ला जोकोविच अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहचला होता.

https://twitter.com/atptour/status/1304654970516418560

थीमने केला डॅनिएल मदवेदेवचा पराभव

त्याच वेळी, ऑस्ट्रियाच्या 27 वर्षीय थीमने गेल्या वर्षीच्या उपविजेत्या डेनिल मदवेदेवचा उपांत्यपूर्व फेरीत 6-2, 7-6, 7-6 असा पराभव केला. थीम दोन वर्षांपूर्वी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीमध्ये राफेल नदालकडून पराभूत झाला होता, तर यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यामध्ये त्याला नोवाक जोकोविचने पराभूत केले होते. त्यामुळे त्याचे ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले होते. परंतु आता त्याचा यावेळी झ्वेरेवला पराभूत करत पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचा प्रयत्न असेल. झ्वेरेवरही त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्न करेल.

विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू १९९० च्या दशकातील आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आता पुरुष एकेरी गटात १९९० नंतर जन्मलेला ग्रँड स्लॅम विजेता आज मिळणार आहे. तसेच अमेरिकन ओपनलाही आज नवा विजेता मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---