---Advertisement---

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लगावला 103 मीटरचा षटकार! मैदानावरील सर्वच थक्क; पाहा VIDEO

On: रविवार, जून 2, 2024 11:53 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. डलास येथील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना अमेरिकेनं 7 गडी राखून जिंकला. या सामन्यात भरपूर चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. अमेरिकेचा फलंदाज ॲरॉन जोन्सनं या सामन्यात शानदार खेळी करत एक गगनचुंबी षटकार लगावला, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

कॅनडाचा कर्णधार साद बिन जफरनं लेन्थ बॉल फेकला, जो ॲरॉन जोन्सनं मागे सरकत बॅटच्या मध्यभागावरून खूप जोरात टोलावला. चेंडू इतका वेगवान आणि उंच गेला की तो थेट स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. ॲरॉन जोन्सचा हा षटकार तब्बल 103 मीटर लांब होता. जोन्स इथेच थांबला नाही. त्यानं आणखी काही दमदार फटके मारले आणि अवघ्या 22 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ॲरॉन जोन्स हा अमेरिकेसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 

कॅनडाविरुद्ध ॲरॉन जोन्सनं शानदार खेळी केली. त्यानं 40 चेंडूत 235 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 94 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. अमेरिकेनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कॅनडाच्या संघानं शानदार फलंदाजी केली. कॅनडानं 20 षटकात 5 गडी गमावून 194 धावा केल्या आणि अमेरिकेला 195 धावांचं लक्ष्य दिलं. कॅनडाकडून नवनीत धालीवालनं 44 चेंडूत 61 धावा केल्या, तर निकोलस किर्टननं 31 चेंडूत 51 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरची विकेट पडली. मात्र यानंतर अमेरिकेनं शानदार पुनरागमन करत 17.4 षटकांत 3 गडी गमावून 197 धावा केल्या. अशाप्रकारे त्यांनी हा सामना 7 गडी राखून सहज जिंकला. या सामन्यात ॲरॉन जोन्सशिवाय अँड्रिस गुसनंही शानदार फलंदाजी केली. त्यानं 46 चेंडूत 65 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय करावं ते सुचेना! सराव सामन्यात रिषभ पंतच्या तुफानी खेळीनं गोलंदाजांच्या मनात भरली धडकी

यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव

हार्दिक पांड्यानं मारलेला चेंडू थेट हातावर येऊन लागला! बांगलादेशच्या गोलंदाजाला जबर दुखापत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---