भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांची मालिका सोमवारी (13 मार्च) समाप्त झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यामुळे भारतीय संघाने मालिका 2-1 अशी खिशात घातली. या प्रतिष्ठित मालिकेत सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.
नागपूर व दिल्ली येथे झालेले मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने आपल्या नावे केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार पुनरागमन करत इंदोर येथील तिसरा सामना जिंकला. ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला सामना अनिरुद्ध राखला तरी चालणार होते. पाचही दिवस फलंदाजांना पोषक राहिलेल्या या खेळपट्टीवर चार फलंदाजांनी शतके साजरी केली. त्यामुळे मालिका तसेच ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला.
कसोटी क्रिकेट मधील सर्वात प्रतिष्ठेच्या मालिकांपैकी एक असलेल्या या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने मिळवला. या मालिकेत दोन अर्धशतके व एक शतक साजरे करताना त्याने 47.77 च्या सरासरीने 333 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेला भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने अखेरच्या कसोटीत 186 धावांची खेळी केली. याचा फायदा त्याला झाला. यामुळे तो 297 धावांसह या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला.
भारताचा अष्टपैलू व या मालिकेत प्रामुख्याने आठव्या-नवव्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या अक्षर पटेल यांनी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत थेट तिसरे स्थान पटकावले. अक्षरने मालिकेत तीन अर्धशतके पूर्ण करत 264 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 88 पेक्षा जास्त होती. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज मार्नस लॅब्युशेन व भारतीय कर्णधार रोहित शर्मा हे अनुक्रमे 244 व 242 धावांसह चौथ्या व पाचव्या क्रमांकावर राहिले.
(Usman Khawaja And Virat Kohli Tops Most Rungettters List In Border-Gavaskar Trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी पुरस्कार अन् जडेजाच्या मध्ये ‘हा’ इंग्लिश खेळाडू बनला काटा, सलग दुसऱ्यांदा मारली बाजी
VIDEO | केन विलियम्सन ठरला हिरो! शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयी, भारत WTCच्या फायनलमध्ये