---Advertisement---

पाच वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पठ्ठ्या म्हणतोय, “आता वनडेचा खेळ खल्लास”

On: शनिवार, जुलै 23, 2022 3:33 PM
Australia Cricket Team
---Advertisement---

टी२० क्रिकेटच्या वाढत्या लीगमुळे कसोटी आणि वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक माजी क्रिकेटपटूंनी नकारार्थी उत्तरे दिली होती. त्यातच पुन्हा एकदा वनडे क्रिकेट धोक्यात आले आहे आणि ते शेवटाकडे जात आहे अशी मते व्यक्त केली जात आहे. अशातच ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानेही ५० षटकाचा खेळ हळूहळू समाप्तीच्या मार्गावर जात आहे, असे मत मांडले आहे.

नुकतेच इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयानंतरच वनडे क्रिकेट धोक्यात आल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर धरला आहे. स्टोक्सने त्याच्या निवृत्ती मागचे कारण सांगताना म्हणाला, कामाचे नियोजन करणे अवघड झाले असून खेळाडूला कारप्रमाणे वागणूक दिली जाते.

स्टोक्सच्या या विधानावरून अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. ईएसपीएनशी बोलताना उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक पाहिले तर त्यातून तुम्हाला कोणत्यातरी एका प्रकारचा त्याग करावा लागणार आहे. अशा स्थितीत वनडे क्रिकेटचा पर्याय निवडता येईल. हे माझे वैयक्तिक मत आहे.”

“कसोटी हे क्रिकेटमधील महत्वाचा भाग आहे. क्रिकेटचा हा एक सर्वोत्तम प्रकार आहे. तसेच तुमच्याकडे टी२० आहे जे चाहत्यांना खूप प्रिय असून जगभरात त्याच्या अनेक लीग खेळल्या जातात. त्यानंतर शेवटी वनडे क्रिकेट येते. या प्रकाराला नेहमी तिसरेच स्थान मिळणार आहे,” असेही ख्वाजा पुढे म्हटला आहे.

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) यांनीही ‘काही दिवसांपूर्वी वनडे क्रिकेट बंद करा’, असे आश्चर्यकारक विधान केले होते. तसेच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही टी२० लीग अधिक खेळल्या जाव्या यावर जोर दिला होता.

कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले होते अशा चर्चा काही महिन्यांपूर्वी केल्या जात होत्या. तर जेव्हापासून आयसीसीने कसोटी अजिंक्यपद ही स्पर्धा सुरू केली त्यानंतर काही फरक दिसत आहेत. जे या प्रकारासाठी उत्तम ठरत आहे. अनेक छोटे संघ हा कसोटी सामनेे खेळण्यास उत्सुक आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट कोणता देश अधिक खेळला असेल तर त्याचे उत्तर अर्थातच क्रिकेटचा जनक इंग्लंड याचे नाव पुढे येते. त्यांनी १८७७पासून ते आतापर्यंत १०५२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ८४४, वेस्ट इंडिजने ५६५ आणि भारताने ५६३ कसोटी सामने खेळले आहेत.

वनडे क्रिकेटचा इतिहास पाहिला तर पहिला सामना १९७१मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने जिंकला होता. तसेच सर्वाधिक वनडे सामने खेळण्यामध्ये भारताचा क्रमांक पहिला लागतो. भारतीय संघाने १९७४ पासून ते आतापर्यंत १००६ सामने खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिजने ८४७, इंग्लंड ७६९, ऑस्ट्रेलियाने ९६६, न्यूझीलंडने ७८१, पाकिस्तानने ९४२, दक्षिण आफ्रिकेने ६४३ श्रीलंकेने ८७५, झिम्बाब्वेने ५४४ वनडे सामने खेळले आहेत.

ख्वाजाने  ४० वनडे सामने खेळले असून त्यात त्याने ४२च्या  सरासरीने १५५४ धावा केल्या आहेत. त्यात २ शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ५१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४७.१८च्या सरासरीने १२ शतके आणि १७ अर्धशतके करत ३७७५ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ही कसली व्यथा! कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघ सज्ज, पण व्हिसा वाढवतंय टेन्शन

WIvsIND: संजू सॅमसनच्या ‘त्या’ अप्रतिम डाईव्हने पराभवापासून बचावला भारत, व्हिडिओ व्हायरल

अजहरूद्दीन शेर, तर धवन सव्वाशेर, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत ‘गब्बर’च्या नावावर मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---