अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलण्याचे काम उस्मान ख्वाजा याने केले. त्याने यादरम्यान 422 चेंडूंचा सामना करत 180 धावा चोपल्या. त्याचवेळी त्याच्या मुली टीव्ही समोर बसून, आपल्या वडिलांना प्रोत्साहन देत असल्याचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या मालिकेतील आत्तापर्यंत सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन फलंदाज दिसलेल्या ख्वाजाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर आपली छाप सोडली. पहिला संपूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली दोन सत्रे त्याने यशस्वीरीत्या खेळून काढली. यादरम्यान आपल्या कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक त्याने झळकावले. 422 चेंडूंचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावांची खेळी त्याने सजवली.
https://www.instagram.com/p/CpmNPS4SvK5/?igshid=YmMyMTA2M2Y=
ख्वाजा भारतीय गोलंदाजांचा सामना करत असतानाच, त्याच्या मुली टीव्ही समोर बसून आपल्या वडिलांना प्रोत्साहन देताना दिसल्या. त्याची पत्नी रॅचेलने एक इंस्टाग्राम पोस्ट करत एक छायाचित्र शेअर केले. त्यास कॅप्शन देताना तिने लिहिले,
‘उझी, तुझ्या सर्वात लहान चाहत्या इथे आहेत. त्यात तुला घरून पाहतायत. हाय डॅडा’
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा उभ्या केल्या. ख्वाजासह ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी शतक साजरे केले. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघासाठी सलामीवीर शुबमन गिल याने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक पूर्ण करत, भारताला सामन्यात मजबुतीने उभे केले आहे.
(Usman Khawaja Daughters Supporting Him From Home Instagram Photo Viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनने उंचावली भारतीयांची मान! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा तिसरा युवा खेळाडू, इतर दोघे कोण?
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक