AUS vs PAK: ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने धक्कादायक विधान केले आहे. जर कसोटी सामने कायमचे गुलाबी चेंडूने खेळवले गेले तर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेईन असे त्याने म्हटले आहे.
खरंतर, खराब प्रकाशामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ मध्यंतरी थांबवावा लागला. यानंतर चर्चेदरम्यान काही माजी क्रिकेटपटूंनी असा सल्ला दिला होता की, कसोटी क्रिकेट लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूने खेळले तर प्रकाशाची समस्या उद्भवणार नाही. दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये फक्त गुलाबी चेंडू वापरला जातो. (usman khawaja reacts on playing tests with pink balls permanently)
यावर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याचे मत आहे की, कसोटी सामने लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूने खेळणे हा उपाय नाही. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, “असे कायमचे झाले तर मी निवृत्ती घेईन. या समस्येवर हा उपाय आहे असे मला वाटत नाही. लाल चेंडू अगदी वेगळा आहे. मी एक पांढरा चेंडू, एक गुलाबी चेंडू आणि एक लाल चेंडू खेळलो आहे आणि तिन्ही चेंडू खूप वेगळ्या पद्धतीचे असतात. आम्ही लाल चेंडूचे कसोटी क्रिकेट बघत मोठे झालो आहोत. लाल चेंडू हे खरे कसोटी क्रिकेट आहे. गुलाबी चेंडू जास्त चांगला आहे पण तो लाल चेंडूसारखा नाही आणि हा माझा युक्तिवाद आहे.”
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यानी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला की, “हा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना आहे आणि तरीही आम्ही मैदानाबाहेर जात आहोत. ही बाब क्रिकेटसाठी चांगली नाही.” (If this happens I will retire the shocking statement of the Australian legend)
हेही वाचा
BBL 2023-24: लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान ब्रेट लीने हिंदीत केली खेळाडूची विचारपूस, पाहा मजेदार व्हिडिओ
T20 World Cup: टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; बाकीची नावे आश्चर्यचकित करणारी, पाहा संपूर्ण यादी