उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशन व शौर्य क्रिडा मंडळ तडवळा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष व महिला गट उस्मानाबाद जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी जयहिंद विद्यालय तडवळा येथे घेण्यात येणार आहे. तरी सर्व संघानी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे तरी जिल्ह्यातील क्रिडा मंडळे शाळा महाविद्यालये क्रिडाप्रेमी ने सहभाग नोंदवावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव महादेव साठे सर, कार्याध्यक्ष लक्ष्मण मोहिते, उपाध्यक्ष फुलचंद कदम, गोपाळ येळमकर, संग्राम मोहिते व सुबराव कांबळे यांनी केले आहे.
सदर स्पर्धेतून उस्मानाबाद जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. ते संघ चिपळूण येथे १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या ६७ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील






