भारतात सध्या रणजी चषकाच्या बाद फेरीतील सामने सुरू आहेत. या बाद फेरीतील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्याची लढत उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या दोन संघांमध्ये झाली. या सामन्यांत उत्तर प्रदेशच्या संघाने कर्नाटक संघाचा ५ गडी राखत पराभव केला आणि उपांत्य सामन्यांत धडक मारली.
या महत्तवपूर्ण अशा बाद फेरीतील सामन्यांत नाणेफेक जिंकत उत्तर प्रदेशच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कर्नाटक संघाकडून खेळताना सलामीवीर रविकुमार समर्थ आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस गोपाळ यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने २५३ धावा बनवल्या. यावेळी उत्तर प्रदेशचा गोलंदाज सौरभ कुमार यानं ४ बळी घेत उतकृष्ट प्रदर्शन केले.
कर्नाटकने बनवलेल्या २५३ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात उत्तर प्रदेशचा संघ विशेष कामगिरी करण्यास अपयशी ठरला. यावेळी कर्नाकच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकत केवळ १५५ धावात उत्तर प्रदेशचा संघ सर्वबाद झाला. यावेळई कर्नाटकसाठी रोनित मोरे याने सर्वाधिक ३ बळी घेतले.
दुसऱ्या डावात ९८ धावांची आघाडी असणारा कर्नाटकचा संघ फलंदाजीसाठी आला त्यावेळी मात्र त्यांना केवळ ११४ धावा काढता आल्या. यावेळी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचा फिरकीपटू सौरभ कुमारने ३ बळी घेत विशेष खेळी केली. त्यानंतर उत्तर प्रदेशसमोर विजय मिळवण्यासाठी २१३ धावांचे आव्हान होते. यावेळी उत्तर प्रदेशकडून फलंदाजी करत असताना कर्णधार करण शर्माने झंझावाती नाबाद ९३ धावांची खेळी केली. याशिवाय प्रियाम गर्गने अर्धशतकीय खेळी करत उत्तर प्रदेशला विजय मिळवून दिला.
दरम्यान, या उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत उत्तर प्रदेश संघाने उपांत्य सामन्यांत प्रवेश मिळवला आहे. आता संघाला अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवण्यापूर्वी मुंबईच्या संघाचे आव्हान पेलावे लागेल.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडल्याने केएल राहुलचे तुटले हृदय, केले इमोशनल ट्वीट
‘संजूला संघात आणा’, केएल राहुल बाहेर झाल्याने चाहत्यांकडून मागणीला जोर, ट्विट्सचा पाऊस
‘कर्णधार’ आझम विंडीजला पुरून उरला, खणखणीत शतक ठोकत विराटचा विश्वविक्रम मोडला