---Advertisement---

बीसीसीआयने कितीही प्रयत्न केले तरी वैभव सूर्यवंशीचे भारतीय संघात पदार्पण नाही! वाचा सविस्तर

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 4:12 PM
---Advertisement---

भारताच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने नुकतेच आयसीसी विश्वचषक जिंकला. हरारेमध्ये ६ फेब्रुवारीला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीची खेळी लक्षवेधी ठरली. १४ वर्षाच्या या खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. अनेकदा मोठ्या,स्फोटक खेळी केल्याने त्याला भारतीय संघात जागा मिळाली पाहिजे, असे खूप जणांनी म्हटले आहे. मात्र बीसीसीआय याबाबतीत काहीच करू शकत नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवले तरीही ते वैभवला सध्या वरिष्ठ संघात घेऊ शकत नाही. त्याच्या मागचे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) आहे.

वैभवची भारतीय संघात जाण्याची पहिली अडचण त्याचे वय आहे. आयसीसीच्या वयाच्या पॉलिसीनुसार एका खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी कमीत कमी वय १५ वर्ष पूर्ण पाहिजे.

वैभवचा जन्म २७ मार्च, २०११ला झाला आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला असला तरी त्याचे सध्याचे वय १४ वर्ष आहे. आता त्याने कितीवेळाही जलद शतक ठोकू दे किंवा गोलंदाजांची झोप उडवू दे, राष्ट्रीय निवडकर्त्यांना मात्र २७ मार्च, २०२६ पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

वरिष्ठ संघासाठी वैभव अजुनही युवा खेळाडू आहे, मात्र त्याचा १९ वर्षाखालील संघातील प्रवास संपला आहे. बीसीसीआयने १९ वर्षाखालील विश्वचषक खेळण्यासाठी वन ऍंड डन धोरण ठेवले आहे. त्यामध्ये कोणताही खेळाडू एकदाच १९ वर्षाखालील विश्वचषक खेळू शकतो. राहुल द्रविडच्या म्हणण्याने बीसीसीआयने २०१६मध्ये हा नियम लागू केला आहे. यामुळे खेळाडू पात्र असला तरी १९ वर्षाखालील दुसरा विश्वचषक खेळू शकत नाही.

वैभवने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावा केल्या. त्याच्या या उल्लेखनीय खेळीने भारताने ४११ धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. तसेच त्याने या सामन्याच्या ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराबरोबर ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार’ही मिळवला.

भारताने मिळवलेल्या या विजयाचे दिग्गज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सध्याच्या वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आर अश्विन यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---