---Advertisement---

ब्रेकिंग! वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये एंट्री, ‘बेबी बॉस’ची इंग्लंड-आर्यंलड दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघात निवड

On: शनिवार, जून 6, 2026 1:32 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (शनिवार, 6 जून) इंग्लंड आणि आर्यंलड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष वरिष्ठ टी20 संघाची घोषणा केली. या निवडलेल्या 16 सदस्यांमध्ये आयपीएल 2026 चा हंगाम गाजवणारा युवा स्फोटक फलंदाजी वैभव सूर्यवंशी याची निवड करण्यात आली आहे. त्याला भारताच्या युरोप दौऱ्यासाठी टी20 संघात स्थान देण्यात आले आहे.

त्याचबरोबर वैभवची जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशियन गेम्स 2026 साठीही भारतीय संघात निवड झाली आहे. यामुळे तो भारतीय पुरुष संघात निवड झालेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. युरोप दौऱ्यात भारताच्या टी20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यर याच्यावर सोपवली आहे. तसेच तिलक वर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघात संजू सॅमसन आणि इशान किशन यांचे स्थान कायम आहे.

भारत 26 जून आणि 28 जून या दिवशी आयर्लंड विरुद्ध टी20 सामने खेळणार आहेत. त्यानंतर भारत 1 जुलैपासून इंग्लंडमध्ये पाच टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच सप्टेंबरमध्ये जपान येथे एशियन गेम्सला सुरूवात होईल. यासाठीही संघ जाहीर झाला असून यामध्येही संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयसला देण्यात आली आहे. तसेच संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

आशियाई क्रीडा (एशियन गेम्स) स्पर्धांसाठी भारताचा संघ –
श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.

भारताचा 2026 टी20 विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून काढण्यात आले. त्याचबरोबर त्याला संघातूनही वगळण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---