---Advertisement---

वैभव सूर्यवंशीचा आता गोलंदाजीतही जलवा! पहिली विकेट घेताच इतिहासात कोरले नाव

On: सोमवार, जुलै 14, 2025 5:19 PM
---Advertisement---

Vaibhav Suryavanshi created history: इंग्लंड दौऱ्यावर युथ वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष्य वेधू घेतले. वनडे मालिकेत त्याने एकूण 355 धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता. युथ वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवने केवळ 52 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते आणि त्यावेळी तो युथ वनडेमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज बनला होता. (Youngest Centurion in Youth ODI) आता भारतीय अंडर-19 आणि इंग्लंड अंडर-19 यांच्यातील पहिला युथ कसोटी सामना खेळला जात आहे, ज्यात वैभवने आपल्या फलंदाजीने नव्हे, तर गोलंदाजीने कमाल केली आहे. (Vaibhav Suryavanshi youngest bowler)

इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या युथ कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशीने 6 षटकांची गोलंदाजी केली आणि त्यात केवळ 10 धावा देत 1 विकेट घेतली. त्याने इंग्लंड अंडर-19 संघाचा कर्णधार हमजा शेखला बाद केले. विकेट घेण्यासोबतच त्याने इतिहास रचला. तो युथ कसोटी सामन्यांमध्ये विकेट घेणारा सर्वात युवा भारतीय गोलंदाज बनला आहे. (Youngest Indian Bowler to take a wicket in Youth Test) त्याने 14 वर्षे 107 दिवसांच्या वयातच विकेट मिळवली आहे. (Vaibhav Suryavanshi record)

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात (IPL 2025 Mega Auction) वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 1.1 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. यानंतर त्याने आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने मागील हंगामातील 7 सामन्यांत 252 धावा केल्या, ज्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता.

इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या पहिल्या युथ कसोटी सामन्यात भारत अंडर-19 संघाने प्रथम फलंदाजी करताना 540 धावांचा मोठा डोंगर उभारला. भारतासाठी आयुष महात्रेने शतक झळकावत 102 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त अभिज्ञान कुंडूने 90 धावा आणि राहुल कुमारने 85 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय अंडर-19 संघ मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी ठरला. (India U19 vs England U19)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---