Vaibhav Suryavanshi: भारताच्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या (NCA) अंडर-19 कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफानी फलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये वैभव प्रभावी फटकेबाजी करताना दिसतोय.
‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यवंशीने विविध दिशांकडे जोरदार फटके मारत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.
Vaibhav Suryavanshi in the U19 NCA camp. ????pic.twitter.com/e6eCD9yqiV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 7, 2025
आयपीएल 2025 मध्ये देखील राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने दमदार कामगिरी केली होती. त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत तुफानी शतक झळकावले होते. त्याने 35 चेंडूत 100 धावा केल्या. याच वेळी त्याने उत्तुंग 18 षटकार ठोकले होते. यादरम्यानच तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. (Vaibhav Suryavanshi fastest century in IPL)
वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा गेल्या काही महिन्यांपासून चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे अंडर-19 स्तरावर त्याचा फॉर्म पाहता, तो लवकरच इंडिया U-19 संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.





