सध्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांसारखे अनेक स्टार भारतीय खेळाडू देखील या देशांतर्गत वनडे स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. दरम्यान या स्टार खेळाडूंमध्ये एका 13 वर्षीय खेळाडूने चमकदार कामगिरी केली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून बिहारकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आहे.
बडोद्याविरूद्ध खेळल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात ‘वैभव सूर्यवंशी’ने (Vaibhav Suryavanshi) शानदार खेळी केली. धावांचा पाठलाग करताना वैभवच्या बॅटमधून ही खेळी आली. त्याने 42 चेंडूत 8 चौकारांसह 4 षटकारांच्या मदतीने 71 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 169.05 राहिला.
2025च्या आयपीएलसाठीच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) विकला जाणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सर्वात तरूण करोडपती ठरला आहे. आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा लिलावात राजस्थान राॅयल्सने 13 वर्षीय वैभवला 1.10 कोटी रूपयांना विकत घेतले आहे.
वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी सामने, 3 लिस्ट ए सामने (बडोद्याविरूद्धचा सामना वगळता) आणि 1 टी20 सामना खेळला आहे. दरम्यान त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 100 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ‘लिस्ट ए’च्या 3 डावात 17 धावा केल्या आहेत, तर एका टी20 सामन्यात त्याने 13 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट; इंग्लंडविरूद्धच्या आगामी वनडे मालिकेतून रोहित, विराट बाहेर
“हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टेस्ट …”, बॉक्सिंग डे कसोटीबाबत पॅट कमिन्सची प्रतिक्रिया समोर
विनोद कांबळीच्या तब्येतीत सुधारणा, हॉस्पिटलमधील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल