पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात फिरकीपटू रोहित चौधरी(3-76) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाला 269 धावांवर रोखत धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशी युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजीपासून डावास सोमवारी (८ नोव्हेंबर) सुरुवात झाली. तत्पूर्वी रविवारी (७ नोव्हेंबर) प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 80.1 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव 74.2 षटकात सर्वबाद 269 धावावर संपुष्टात आला. यात मल्हार वंजारीने 83चेंडूत 8चौकारांसह 60धावा व श्रीराज चव्हाणने 58चेंडूत 5चौकार व 1षटकारासह 45 धावा केल्या. या दोघांनी नवव्या गड्यासाठी 126 चेंडूत 97 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
व्हेरॉककडून रोहित चौधरीने 76 धावात 3 गडी बाद केले. त्याला समर्थ जगतापने 41 धावात 2 गडी, सुरज गोंड(1-15), हर्षवर्धन पवार(1-23) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ देत संघाला पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आज दिवसखेर 25 षटकात 1 गड्याच्या बदल्यात 79 धावा केल्या. यात यश जगदाळे नाबाद 33 धावा, जयेश पोळ नाबाद 34 धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 80.1 षटकात सर्वबाद 273 धावा वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 74.2षटकात सर्वबाद 269 धावा(मल्हार वंजारी 60(83,8×4), श्रीराज चव्हाण 45(58,5×4,1×6), निमीर जोशी 32, परम अभ्युदया 31, आदित्य राजहंस 20, श्रेयस चव्हाण 20, रोहित चौधरी 3-76, समर्थ जगताप 2-41, सुरज गोंड 1-15, हर्षवर्धन पवार 1-23); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 4 धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 25षटकात 1बाद 79धावा(यश जगदाळे नाबाद 33(68,2×4), जयेश पोळ नाबाद 34(60,3×4,2×6), हर्षवर्धन खांदवे 12, मल्हार वंजारी 1-11) वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: