वाराणसी। उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक क्रिकेटपटू जिंवत काडतूससोबत सापडला आहे. सीआयएसएफने त्याला पकडून फूलपूर पोलिसांकडे सोपविले आहे. पोलिसांनी त्या क्रिकेटपटूचे चालान कापले आहे. तो युवा क्रिकेटपटू अल्पवयीन असून देवरिया जिल्ह्याचा राहणारा आहे. तो हैद्राबाद येथील क्रिकेट अकादमीत मागील ३ वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. असे असले तरीही त्या क्रिकेटपटूच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
असे म्हटले जात आहे की तो कोरोना व्हायरसमुळे मागील काही दिवस सुट्टीवर आला होता. आता तो हैद्राबादला परतत होता. इंडिगो विमानात त्याचे तिकीट बुक केले होते. परंतु एक्सरे तपासणीदरम्यान तो युवा क्रिकेटपटू सापडला आहे. असे सांगितले जात आहे की, बॅगेत जिवंत काडतूस घेऊन सुरुवातीच्या तपासणी केंद्र पार करत तो चेक इन एरियापर्यंत पोहोचला होता. परंतु एक्स-रे तपासणी दरम्यान त्याने सुरक्षा धारकाच्या क्षेत्रात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांना बॅगेमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याची शंका आली. तपासामध्ये त्याच्या बॅगेमधून .३२ बोर काडतूस सापडले.
म्हणाला, बसमध्ये सापडले काडतूस
काडतूस सापडल्यानंतर सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि फूलपूर पोलिसांना कळविले. फूलपूर पोलिसांनी त्या क्रिकेटपटूला ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्या क्रिकेटपटूने सांगितले की, देवरियावरून येत असताना त्याला बसमध्ये हा काडतूस सापडले, जो त्याने उचलला.
यापूर्वीही राख व काडतुसे जप्त केली आहेत
फूलपूर पोलीस स्टेशनमधील प्रभारी सरवर अलीने सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या युवकाचे चालान कापण्यात आले आहे. तरीही विमानतळावर काडतूस आणि राख सापडण्याची ही पहिली घटना नाही. यावर्षी १२ जानेवारीला बिहारच्या मझियावा येथे राहणाऱ्या ओमप्रकाश शर्माकडे काडतूस सापडले होते. त्यापूर्वी २०१८ मध्ये असेच २ प्रकरणे समोर आली होती. ज्यामध्ये २४ ऑगस्ट २०१८ ला भदोहीच्या कुमुद सिंगला देशी बंदुकीसह पकडण्यात आले होते, तर त्याच वर्षी १ ऑक्टोबरला बलियाच्या फेफना येथे राहणाऱ्या शुभम मिश्राकडेही काडतूस सापडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणतोय, मी सचिन तेंडूलकरला सांगितले होते की धोनी…
-‘द वॉल’ द्रविड म्हणतो, जर रैनाला ही संधी मिळाली असती तर आज…
-‘ले जा रे मुझे’ म्हणत क्वारंटाइन तोडून हॉटेलच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय चहल; पहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
-सीपीएल २०२०: जमैका तल्लावझ विरुद्ध सेंट ल्युसिया झुक्स सामन्यांत ‘या’ ३ खेळाडुंवर असेल नजर
-आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
-धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा