---Advertisement---

14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची आगेकूच

On: बुधवार, नोव्हेंबर 21, 2018 11:01 PM
---Advertisement---

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्यातर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

नेहरू स्टेडीयम येथे  झालेल्या या सामन्यात साखळी फेरीत ओंकार राजपुतच्या अफलातून अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाने कॅडेन्स अकादमी संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ओंकार राजपुत व सक्षम काडलक यांच्या अचूक गोलंदाजीपुढे

कॅडेन्स अकादमी संघ केवळ 28.1 षटकात सर्वबाद 122 धावांत गारद झाला. वेदांत जगदाळेने 44  धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. ओंकार राजपुतने 20 धावांत 4 तर सक्षम काडलकने 35 धावांत 3 गडी बाद करत कॅडेन्स अकादमी संघाचा धुव्वा उडवीला. तर भार्गव महाजन , साहिल सावंत व ओम भाबड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

122 धावांचे लक्ष यश्वीत साईच्या 38, ओंकार राजपुतच्या नाबाद 27,कबीर भट्टचार्जीच्या नाबाद 11 तर प्रसन्न पवारच्या 21 धावांसह  व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाने केवळ 27.5 षटकात 3 गडी गमावत 125 धावांसह सहज पुर्ण केले. नाबाद 27 धावा व 20 धावांत 4 गडी बाद करणारा ओंकार राजपुत सामनावीर ठरला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी 

कॅडेन्स अकादमी- 28.1 षटकात सर्वबाद 122 धावा(वेदांत जगदाळे 44, मोहित दहिभाते 24, अनिरूध्द साबळे 20, ओंकार राजपुत 4-20, सक्षम काडलक 3-35, भार्गव महाजन 1-15, साहिल सावंत 1-17, ओम भाबड 1-18) पराभूत वि व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी –  27.5 षटकात 3 बाद 125 धावा(यश्वीत साई 38, ओंकार राजपुत नाबाद 27, प्रसन्न पवार 21, कबीर भट्टचार्जी नाबाद 11, अर्कम सय्यद 1-20) सामनावीर- ओंकार राजपुत

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment