---Advertisement---

टीम इंडियाचे एकेवेळचे स्पीडमशीन आयपीएलमध्ये करतेय कमबॅक; शेअर केला खास व्हिडिओ

On: शनिवार, जुलै 25, 2020 3:37 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोनाव्हायरसमुळे प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर आयपीएल २०२० स्पर्धेची तारीख स्पष्ट झाली आहे. आयपीएलचा 13 वा मोसम युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएलच्या तारखा निश्चित होताच खेळाडू देखील तयारीला लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यंदाचा पुरुष टी 20 विश्वचषक पुढे ढकलल्यामुळे आयपीएल 2020 भरविण्याची संधी मिळाली. दरम्यान राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉन 19 सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या मोसमात खेळण्यासाठी उत्साहित दिसत आहे.

30 वर्षीय उजव्या हाताच्या गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याचे इंसिंग कौशल्य दाखविले आहे. ही शॉर्ट क्लिप कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याची आहे, ज्यात वरुणने शुभमन गिलला बाद केले. वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शेवटी !!!!!!! ही कामे करण्यासाठी परत भेटू शकतो.”

https://www.instagram.com/p/CDBNn5zFtju/

वरुण ऍरॉनने 9 वनडे आणि 9 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व  केले आहे. त्याच्या नावावर एकूण 29 आंतरराष्ट्रीय बळींची नोंद आहे. त्याने आयपीएलच्या 47 सामन्यात 31.79च्या सरासरीने 42 बळी घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---