---Advertisement---

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे आज निधन

---Advertisement---

भारताचे सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे शनिवारी(१३ जून) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. १०० वर्षीय वसंत रायजी यांनी पहाटे २.३० वाजताच्या आसपास शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि २ मुली आहेत.

वसंत रायजी यांनी याचवर्षी २६ जानेवारीला वयाची शंभरी गाठली होती. विशेष म्हणजे २६ जानेवारी १९२० ला जन्म झालेल्या रायजी यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि  ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्या उपस्थित त्यांची शंभरी साजरी केली होती.

जेव्हा भारताने पहिला कसोटी सामना मायदेशात खेळला होता तेव्हा वसंत रायजी १३ वर्षांचे होते. तसेच ते पहिला कसोटी सामना पहाण्यासाठी बाँम्बे जिमखान्यामध्ये उपस्थित देखील होते.

त्यांनी नंतर १९३९ ला नागपूर येथे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सेंट्रल प्रोविनन्स अँड बेरर विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्यांनी १९४१ ला बाँम्बे (आत्ताची मुंबई) कडून विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. नंतर रायजी हे बडोदाकडूनही क्रिकेट खेळले.

उजव्या हाताने फलंदाजी करणारे रायजी हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत १९३९ ते १९५० सालाच्या दरम्यान ९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यात त्यांनी २७७ धावा केल्या. यातील ६८ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच इंग्लंडला शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी तिथे क्लब क्रिकेट देखील खेळले आहे.

रायजींनी व्यावसायिक क्रिकेट खेळणे थांबविल्यानंतर, इतिहासकार म्हणून त्यांनी या खेळाशी आपला संबंध कायम ठेवला. त्यांनी १२ हून अधिक क्रिकेटवर पुस्तके लिहिली आहेत, ज्यात सीके नायडू यांच्या आत्मचरित्राचाही समावेश आहे.

त्यांच्या निधनामुळे आता न्यूझीलंडचे ऍलेन बर्गिज यांच्या नावावर सध्या हयात असलेले सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होण्याची नोंद झाली आहे. त्यांचा जन्म १ मे १९२० ला झाला होता. त्यांनी १९४० ते १९५२ च्या दरम्यान १४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

अबब! वयाच्या ३६व्या वर्षी हा पाकिस्तानचा खेळाडू करतोय संघात चौथ्यांदा कमबॅक

मुक्या प्राण्यांची सेवा करतानाचा शिखर धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

अजिंक्य रहाणेकडून वाढदिवसाच्या दिवशीच आदित्य ठाकरेंचं जोरदार कौतूक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---