भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे जी बिग बॅश लीगमध्ये यावर्षी खेळणार आहे.
ती हॉबर्ट हेरिकेन्स या संघाबरोबर करारबद्ध झाली आहे.
वेदाबरोबर भारतीय संघाला इंग्लंड देशात इंग्लंडविरुद्ध विश्वचषकात अंतिम फेरीत नेण्यात महत्वाची भूमिका बजावणारी दीप्ती शर्माचेही एका फ्रॅन्चायजीबरोबर बोलणे सुरु आहे.
यापूर्वी हरमनप्रीत कौर आणि स्म्रिती मानधना ह्या दोन भारतीय महिला क्रिकेटपटू बिग बॅश लीगमध्ये खेळल्या आहेत. बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या त्या दोघी पहिल्या दोन भारतीय महिला क्रिकेटर आहेत.
“मी खूप आनंदी आहे कि मला बिग बॅश लीगचा भाग होता येणार आहे. ही स्पर्धा संपूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे याकडे मी एक संधी म्हणून पाहत आहे. मला तिकडे जाऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. मी यापूर्वी भारताकडून तिकडे खेळली आहे आता मला माझ्या नव्या क्लबकडून चांगली कामगिरी करायला आवडेल असे. ” स्पोर्टसकिडाशी बोलताना वेदा म्हणाली.