2025च्या आयपीएल हंगामाची चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. तत्पूर्वी बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या नवीन रिटेन्शन नियमांनुसार संघांनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. आता सर्वांचे लक्ष्य मेगा लिलावाकडे (Mega Auction) लागले आहे, जो (24-25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियाच्या रियाध येथे होणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा पहिला संघ आहे, ज्याने 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे. दरम्यान केकेआरने रिलीज केल्यानंतर अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) भावनिक वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रिंकू सिंह (Rinku Singh), वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy), सुनील नरेन (Sunil Narine), आंद्रे रसेल (Andre Russell), हर्षित राणा (Harshit Rana) आणि रमनदीप सिंग (Ramandeep Singh) यांना आयपीएल 2025 साठी संघात कायम ठेवले आहे.
रेव्ह स्पोर्टनुसार, व्यंकटेश अय्यर म्हणाला, “माझा विश्वास आहे की केकेआरने खूप चांगले खेळाडू कायम ठेवले आहेत. 6 खेळाडूंच्या मदतीने त्यांनी गोलंदाजीमध्ये 14-16 षटके राखून ठेवली आहेत आणि फलंदाजीमध्ये संघाने 5 स्थाने राखली आहेत. माझी इच्छा होती की, मी देखील या यादीचा होऊ शकलो असतो.”
व्यंकटेश अय्यर केकेआरच्या संघात कायम ठेवण्याच्या यादीत स्थान न मिळाल्याने नाराज आहे. तो म्हणाला, “केकेआरने माझ्या कारकिर्दीला नवे पंख दिले आणि मी या संघासाठी पूर्ण मेहनत घेऊन खेळलो आहे. केकेआर संघ खास आहे, कारण येथे संघात केवळ 16 खेळाडू नाहीत तर खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि व्यवस्थापन आहे. तसेच आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहतो. पण यावेळी मला रिटेन केले नाही त्यामुळे मी थोडा भावूक झालो.”
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट! मोहम्मद शमी रणजी ट्राॅफी स्पर्धेतून बाहेर! बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे दरवाजे बंद
IND vs SA; टी20 मालिकेचं पूर्ण वेळापत्रक! कधी आणि कुठे पाहायचे सामने, जाणून घ्या सर्वकाही
AUS vs PAK; बाबर आझमचे संघात पुनरागमन, पाकिस्तानचा ऑस्ट्रलियाकडून पराभव