टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबर (बुधवार) रोजी टी-२० मालिकेची सुरुवात झाली. दोन्ही संघ टी-२० विश्वचषकात त्यांना मिळालेल्या अपयशाला विसरून पुन्हा विजयी पथावर परतण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय संघासाठी पहिला सामना अनेकार्थांनी खास ठरला. या सामन्यात भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक आणि नवीन पूर्णवेळ टी-२० कर्णधार मिळाला. मात्र, यासह आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेल्या एका युवा अष्टपैलूचेही या सामन्यातून भारतीय संघासाठी पदार्पण झाले.
न्यूझीलंविरुद्ध मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू बऱ्याच महिन्यांपासून बायो बबलमध्ये होते. याच पार्श्वभूमीवर संघातील विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली. तर भारताच्या अनेक युवा खेळाडूंना या टी-२० मालिकेत संधी दिली गेली. यामध्ये मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर यांनी संघात पुनरागमन केले. तर, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेल्या वेंकटेश अय्यरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले.
The grin says it all! 😊
A moment to cherish for @ivenkyiyer2512 as he makes his #TeamIndia debut. 👏 👏#INDvNZ @Paytm pic.twitter.com/2cZJWZBrXf
— BCCI (@BCCI) November 17, 2021
वेंकटेश अय्यरचा न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळलेला सामना हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना. त्यामुळे सामन्यापूर्वी भारतीय संघातीत सर्व खेळाडूंनी त्याचे संघात स्वागत केले. बीसीसीआयने सामन्यापूर्वीचा एक खास व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केला. ज्यात संघातील प्रत्येक खेळाडू वेंकटेशसोबत हस्तांदोलन करत आहेत, तर काही त्याची गळाभेट घेत आहेत.
Adding colour to his dreams 𝙏𝙝𝙚 𝘼𝙧𝙩 ➡️ 𝙏𝙝𝙚 𝘼𝙧𝙩𝙞𝙨𝙩 💜💙
Congratulations @ivenkyiyer2512 on receiving your maiden #TeamIndia cap! 🇮🇳 🙌#KKR #AmiKKR #INDvNZ #CricketTwitter pic.twitter.com/vlJ6ZX7x9R
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 17, 2021
वेंकटेशनेही सामन्यापूर्वी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाविषयी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी तो म्हणाला की, “क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाची देशासाठी खेळण्याची इच्छा असते. त्यामुळे मला ही संधी मिळाल्यामुळे चांगले वाटत आहे. राहुल द्रविड सरांच्या हाताखाली खेळणे खूप चांगले वाटते. मी खूप उत्साहीत आहे आणि त्याची वाट पाहत आहे.’
Of bond with buddy @Avesh_6 👌
Warm welcome from @ImRo45, Rahul Dravid & @RishabhPant17 👏
Special request for WWE's The Undertaker 😎@ivenkyiyer2512 discusses it all with @28anand in this special feature. 👍 #TeamIndia #INDvNZ
Full interview 🎥 🔽 https://t.co/xPiTo2h1NL pic.twitter.com/hFbxv23wy7
— BCCI (@BCCI) November 17, 2021
‘एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही लवचीक असायला हवे आणि मला मिळालेल्या भूमिकेचा मी फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. मी कोणत्याही स्थितीत फलंदाजी करायला तयार आहे आणि जेव्हा गोलंदाजी करायला सांगितले जाईल तेव्हा तयार असेल.’ अशी प्रतिक्रिया वेंकटेश अय्यरने दिली होती.
हेही वाचा –
रोहितने आत्तापर्यंत १९ टी२० सामन्यात केलं आहे भारतीय संघाचे नेतृत्व, वाचा त्याचे जय-पराजयाचे रिकॉर्ड
कर्णधार रोहित कुशल रणनीतिकार, तर प्रशिक्षक द्रविडमुळे बनेल चांगले सांघिक वातावरण- केएल राहुल
असे ३ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी एकही शतक न ठोकता वनडे क्रिकेटमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा