कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा दिमाखात सुरू केला आहे. प्रथम त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकतर्फी हरवले आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सलाही चारीमुंड्या चित केले. या विजयांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ आता गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे आणि त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच वाढली आहे. कोलकाताच्या या दोन्ही नेत्रदीपक विजयांमध्ये त्यांचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरचा मोलाचा वाटा होता.
त्याने आरसीबी आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध आक्रमक खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या डावखुऱ्या फलंदाजाने मुंबईविरुद्ध अवघ्या ३० चेंडूत ५३ धावा केल्या, तर आरसीबीविरुद्ध त्याने २७ चेंडूत ४१ धावा केल्या होत्या.
व्यंकटेश अय्यरच्या दमदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. दोन्ही सामन्यांमध्ये अय्यरचा स्ट्राईक रेट १५० पेक्षा जास्त होता. त्याचबरोबर त्याने मुंबईविरुद्ध षटकारासह खाते उघडून आपली ताकद दाखवून दिली. ज्याप्रकारे या खेळाडूने बुमराह-बोल्ट आणि ऍडम मिलनेसारख्या गोलंदाजांचा सामना केला, ते पाहता आता प्रत्येकाला त्याचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. मात्र व्यंकटेश अय्यरच्या उज्ज्वल भविष्याचा अंदाज एका व्यक्तीला तेव्हाच आला होता, जेव्हा तो फक्त ७ महिन्यांचा होता.
व्यंकटेशची आई उषा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या मुलाच्या स्टारडमचा अंदाज एका टॅक्सी ड्रायव्हरने लावला होता.
त्या म्हणाल्या की, “जेव्हा व्यंकटेश फक्त ७ महिन्यांचा होता तेव्हा मी त्याच्यासोबत भोपाळहून देवासला जात होते. व्यंकटेश टॅक्सीच्या पुढच्या सीटवर बसला होता आणि ड्रायव्हर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघत होता. जेव्हा त्याची आई टॅक्सीतून खाली उतरली तेव्हा ड्रायव्हरने तिला सांगितले की, व्यंकटेश तुमचे नाव खूप उज्ज्वल करेल. त्याला जे करायचे आहे ते करूद्या.” गंमत म्हणजे जेव्हा व्यंकटेश आरसीबीविरुद्ध फलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या आईला हा प्रसंग आठवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ अष्टपैलूला ठोकायचेत ६ चेंडूत सलग ६ षटकार, सांगितली मनातील इच्छा
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम