भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेत भारताच्या वरिष्ठ संघाची संपूर्ण निवडसमिती बरखास्त केली होती. त्यानंतर नव्या निवडसमितीसाठी अर्ज मागवले होते. या निमंत्रणाला चांगला प्रतिसाद भेटला असून, तब्बल 60 माजी भारतीय क्रिकेटपटूंनी 5 जागांसाठी अर्ज केला आहे.
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीचा ठपका ठेवत बीसीसीआयने भारतीय संघाची चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर नव्या निवड समिती सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर होती. अर्ज मागवण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 60 अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात येतेय. त्यानंतर आता नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचे नाव सर्वात चर्चेत आहे.
नव्या निवड समितीत अध्यक्षपद हे दक्षिण विभागाला दिले जाऊ शकते असे. व्यंकटेश प्रसाद यांनी अर्ज केला असल्याने त्यांना आता त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी असेल. दक्षिण विभागातून इतरही मान्यवर खेळाडूंनी अर्ज केला असला तरी, प्रसाद यांचा अनुभव पाहतात त्यांनाच ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
प्रसाद यांनी भारतीय संघासाठी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या काळात त्यांनी 161 वनडे व 33 कसोटी सामने खेळले. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले. 2007 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषकात ते संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. तसेच 2016 ते 2018 या काळात त्यांनी भारताच्या अंडर नाईन्टीन निवडसमितीचे अध्यक्षपद ही भूषवलेले. त्यावेळी भारतीय 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला. तर, 2018 मध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती.
(Venkatesh Prasad Front runner For New Selection Committee Chairman)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे अस कुठं असतंय व्हय? चेंडू चमकवण्यासाठी रुटने लढवली अनोखी शक्कल, सहकाऱ्याच्या डोक्याचा केला वापर
रावळपिंडीत विक्रमांची रांग! कसोटीच्या इतिहासात चारही सलामीवीरांनी रचला इतिहास