भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना मागच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा विश्रांती दिली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर वेंकटेश प्रदास यांनी ही टीका केली आहे. त्यांच्या मते एक वेळ होता, जेव्हा एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसला, तर त्याला संघातून बाहेर केले जायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे.
वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी एकापाठोपाठ एक अशे दोन ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी लिहिले की, “एक वेळ होती, जेव्हा तुम्हा फॉर्ममध्ये नसला, तर प्रतिष्ठेची परवाह न करता तुम्हाला बाहेर बसवले जायचे. सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, जहीर खान आणि हरभजन सिंग या सर्वांना खराब फॉर्ममुळे बाहेर केले गेले होते. त्यानंतर त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमधून पुनरागमन केले होते. धावा करा आणि संघात पुनरागमन करा.”
“असे वाटत आहे की, नियम खूप बदलले आहेत, जिथे फॉर्ममध्ये नसल्यावर विश्रांती दिली जात आहे. हा प्रगती करण्याचा मार्ग नाहीये. देशांत एवढी प्रतिभा आहे, तर तुम्ही त्या प्रतिष्ठेशी खेळू शकत नाही. भारतीय संघाला सामना जिंकवून देणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक अनिल कुंबळेही अनेकदा बाहेर बसले आहेत. काहीतरी मोठे मिळवण्यासाठी एक्शनची गरज आहे.” प्रसाद यांनी एकप्रकारे थेट विराट कोहलीवर हा निशाणा साधला आहे.
Changed drastically now, where there is rest for being out of form. This is no way for progress. There is so much talent in the country and cannot play on reputation. One of India’s greatest match-winner, Anil Kumble sat out on so many ocassions, need action’s for the larger good
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 10, 2022
त्यांनी ही टीका यामुळेच केली असावी की, विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली होती. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेतही विराट खेळणार नाहीये. विराटला विश्रांती दिली गेली आहे, पण वेंकटेश प्रसादांच्या मते त्याला विश्रांती दिली नाही, संघातून बाहेर केले गेले पाहिजे. जेणेकरू तो देशांतर्गत क्रिकेट खेळून पुन्हा संघात पुनरागमन करू शकेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेला लागला झाला मोठा झटका, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू मालिकेबाहेर
सेहवाग-सचिनने जी कामगिरी कसोटी-वनडेत केली, तसाच कारनामा सूर्यकुमारने टी२०त केलाय
इंग्लंडने रोखला ‘रोहितसेने’चा विजयीरथ अन् ‘हिटमॅन’ची हुकली पाँटिंगचा विश्वविक्रम गाठण्याची संधी