---Advertisement---

IPL आधीच केकेआर संघाच्या या खेळाडूने सराव सामन्यादरम्यान 107 धावा फटकावल्या!

Venkatesh-Iyer
---Advertisement---

आगामी आयपीएल स्पर्धेच्या अठराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना ईडन गार्डनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच व्यंकटेश अय्यर आयपीएल 2025 मध्ये शानदार प्रदर्शन करू शकतो. त्याने याची छोटी झलक दाखवली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये कमालीची फलंदाजी केलेली आहे. त्याने एका सराव सामन्यात दरम्यान शतकी खेळी केली. व्यंकटेशने 2 सरावादरम्यान खेळलेल्या सामन्यात एकूण 107 धावा केल्या आहेत. व्यंकटेशला आयपीएलच्या मेगा लिलावात केकेआर संघाने करोडो रुपयांमध्ये खरेदी केले होते.

व्यंकटेशने सराव सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली तसेच त्याने पहिल्या सराव सेशन दरम्यान 26 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने चांगली फलंदाजी केली, यानंतर त्याने दुसऱ्या सेशनमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि त्यामध्ये 21 चेंडूत 46 धावा केल्या. या प्रकारे त्याने एकूण 47 चेंडूत 107 धावा केल्या. तो आगामी हंगामात संघासाठी कमालीची फलंदाजी करू शकतो.

मागच्या हंगामात देखील व्यंकटेश अय्यरने प्रभावी कामगिरी केली होती. त्याने 15 सामने खेळले होते यादरम्यान त्याने 370 धावा केल्या. तसेच यामध्ये 4 अर्धशतक केले. त्याने आयपीएल 2023 हंगामात सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. व्यंकटेशने 14 सामनांमध्ये 404 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 2 अर्धशतक केले होते. व्यंकटेशने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 51 सामने खेळले आहेत, यादरम्यान त्याने 1326 धावा केल्या आहेत. तो आता या आगामी हंगामामध्ये सुद्धा चांगली खेळी करू शकतो. केकेआर संघाने मागच्या हंगामात आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

कोलकाता नाइट राइडर्स आईपीएल 2025 संघ :

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज़, अंगकृष रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमनदीप सिंह, आंद्रे रसल, एनरिक नॉर्खिया, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, मयंक मारकंडे, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, लवनिथ सिसोदिया, अनुकूल रॉय, मोइन अली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---