पुणे, 11 ऑक्टोबर 2023: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 14 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने विजयी मलिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सहारा क्रिकेट अकादमी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 2बाद 362धावा केल्या. सलामीचा फलंदाज अभिषेक टोपनोने अफलातून फटकेबाजी करत 123चेंडूत 16चौकार व 10 षटकारसह 172 धावा चोपल्या. अभिषेकला प्रज्वल मोरेने 90चेंडूत 12चौकार व 2षटकाराच्या मदतीने 101 धावा काढून चांगली साथ दिली. या सलामीच्या जोडीने 182चेंडूत 225 धावा काढून संघाला भक्कम सुरूवात करुन दिली. त्यानंतर अभिषेक याने आदर्श गव्हाणे नाबाद 51धावा) च्या साथीत 60 चेंडूत 90धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
याच्या उत्तरात सनराईज क्रिकेट स्कूल संघाचा डाव 33.1 षटकात सर्वबाद 118 धावावर संपुष्टात आला. यात ओम पवार 41, रुद्र घुगे 20, अवनीश कुलकर्णी 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉक संघाकडून सईश बारटक्के(3-8), सुबोध दैठणकर(2-34), वीरेन मिराजे(2-25) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 244 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. सामनावीर अभिषेक टोपनो ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सहारा क्रिकेट मैदान:
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 45 षटकात 2बाद 362धावा(अभिषेक टोपनो 172(123,16×4,10×6), प्रज्वल मोरे 101(90,12×4,2×6), आदर्श गव्हाणे नाबाद 51(44,5×4,2×6), तरुण श्रीकृष्णन नाबाद 19, अवनीश कुलकर्णी 1-61) वि.वि. सनराईज क्रिकेट स्कूल: 33.1 षटकात सर्वबाद 118 धावा(ओम पवार 41(40,7×4,1×6), रुद्र घुगे 20, अवनीश कुलकर्णी 12, सईश बारटक्के 3-8, सुबोध दैठणकर 2-34, वीरेन मिराजे 2-25); सामनावीर -अभिषेक टोपनो; व्हेरॉक संघ 244 धावांनी विजयी;