क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे येत आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी (१६ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रांचीतील सेंटेविटा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही (बीसीसीआय) भाग राहिले होते. त्यांच्या निधनानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
अमिताभ (Amitabh Choudhary) हे बीसीसीआयचे कार्यकारी सचिव (BCCI Administrator) होते. इंजिनियरिंग केल्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले होते. त्यानंतर त्यांनी बीसीसीआय समितीचे सदस्यत्वही मिळवले होते. वर्ष २००२ मध्ये ते बीसीसीआयच्या कार्यकारी सचिवपदी निवडले गेले होते. त्यानंतर २००५ मध्ये झारखंडचे तत्कालिन उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांना पराभूत करत ते झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले होते.
पुढे वर्ष २००५ पासून ते २००९ पर्यंत ते भारतीय संघाचे व्यवस्थापकही राहिले होते. त्यानंतर त्यांना वर्ष २०२० मध्ये झारखंडच्या सार्वजनिक सेवा आयोगाचे अध्यक्ष बनवले गेले होते. नुकतेच ते या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आयपीएस अधिकारी अमिताभ यांनी जेएससीएमध्ये तिरंगा फडकावला होता.
#JPSC के पूर्व अध्यक्ष श्री अमिताभ चौधरी जी के आकस्मिक निधन की दुःखद खबर मिली।
पूर्व IPS अधिकारी अमिताभ जी ने राज्य में क्रिकेट के खेल को बढ़ाने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई थी।
परमात्मा दिवंगत आत्मा को शांति प्रदान कर शोक संतप्त परिवार को दुःख की घड़ी सहन करने की शक्ति दे।— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 16, 2022
अमिताभ यांच्या निधनानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांच्या आकस्मिक निधनाची दुःखद बातमी मिळाली. माजी आयपीएस अधिकारी अमिताभजी यांचा राज्यात क्रिकेटचा खेळ वाढवण्यात महत्त्वाचा वाटा होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल या झटक्यातून सावरण्याची शक्ती देवो”, अशा शब्दात ट्वीट करत हेमंत सोरेन यांनी अभिषेक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खेळूद्या की त्याला’, आशिया चषकापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे विराटबद्दल मोठे वक्तव्य
मुंबईला मोठा झटका! तेंडूलकरनंतर आता ‘हा’ महत्वाचा खेळाडूही सोडणार संघ
गोष्ट वेस्ट इंडिजच्या अशा क्रिकेटरची, जो कायमच संघाचा तारणहार ठरला!