---Advertisement---

राजकोटमध्ये घडला इतिहास! हरियाणा पहिल्यांदाज विजय हजारे ट्रॉफीचा मानकरी, राजस्थानला चारली पराभवाची धूळ

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 10:05 PM
???????????????????????????? ???????????? ???????????????????????????? In Vijay Hazare Trophy 2023
---Advertisement---

भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी शनिवारी (16 डिसेंबर) संपन्न झाली. अंतिम सामन्यात हरियाणाने राजस्थानला 30 धावांनी पराभूत केले. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाज हरियाणाने विजेतेपद पटकावले आहे. सुमित कुमार सामनावीर ठरला, ज्याने संघासाठी 28* धावांची खेली आणि गोलंदाज म्हणून 3 विकेट्स घेतल्या.

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून हरियाणाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 50 षटकांमध्ये हरियाणाने 8 विकेट्सच्या नुकसानावर 287 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात राजस्थान संघ 48 षटकात 257 धावा करू शकला. राजस्थानसाठी सलामीवीर अभिजीत तोमर याने 106 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच कुणाल सिंग राठोड यानेही 79 धावांचे योगदान दिले. पण या दोघांव्यतिरिक्त संघातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. परिणामी राजस्थानला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अंकीत चौधरी (4 विकेट्स) अराफत खान (2 विकेट्स) आणि राहुल चौधरी (1 विकेट) यांनी गोलंदाजाच्या रुपात राजस्थानसाठी महत्वाचे योगदान दिले. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

दुसरीकडे सामनावीर ठरलेल्या सुमित कुमार याने हरियाणासाठी राजस्थानच्या सुरुवातीच्या तिन विकेट्स घेतल्या. अवघ्या 12 धावांवर राजस्थानने तीन विकेट्स गमावल्या होत्या. सुमितच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे हरियाणाला सामन्यावर पकड बनवता आली. हर्षल पटेल यानेही तीन विकेट्स घेतल्या. राहुल तेवतिया आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. अंकित कुमार आणि अशोक मनेरी यांनी अनुक्रमे 88 आणि 70 धावांची खेळी हरियाणासाठी केली.

विजय हजारे ट्रॉफीच्या 2023 हंगामात हरियाणा संघाचे प्रदर्शन एकंदरीतच चांगले राहिले. ग्रुप स्टेजमध्ये हरियाणाने एकही सामना गमवाला नाही. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी बंगाल, तर उपांत्य सामन्यात तामिळमाडूला पराभूत केले. अंतिम सामन्यात राजस्थान संघाचे आव्हान समोर असतानाही हरियाणाने दिमाखात विजय मिळवला.(Victory for haryana in Vijay Hazare Trophy 2023)

महत्वाच्या बातम्या – 
जेव्हा कॅप्टन्सीवरुन काढलं तेव्हा रोहित अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये काय करत होता?
रोहित ठरला क्रिकेटच्या मैदानातील शिवराज सिंग चौहान; आपल्यांनीच सोडली साथ! वाचा सविस्तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---