पुणे: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व एमपीएल प्रायोजित लाभले असून अमानोरा व एच2इ सिस्टीम सहप्रायोजित एमपीएल 51व्या राष्ट्रीय ज्युनियर ओपन (19 वर्षांखालील) आणि 36व्या राष्ट्रीय ज्युनियर (19 वर्षांखालील) मुली बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या भाग्यश्री पाटील, तनिशा बोरामणीकर, तामिळनाडूच्या रक्षिता रवी, डब्लूएफएम ज्योत्स्ना एल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना, पुणे येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या ईश्वरी जगदाळेमहिला आंतरराष्ट्रीय मास्टर आंध्रप्रदेशच्या बोमिनी मौनिका अक्षयाला 65 चालींमध्ये बरोबरीत रोखले व अर्ध्या गुणाची कमाई करत आजचा दिवस गाजवला. या डावाचा प्रारंभ वजिरासमोरील प्याद्याच्या चालीने(क्वीन पॉन ओंपनिंग) झाला. काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या बोमिनीची बाजू सुरुवातीला वरचढ होती. परंतु पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्या ईश्वरीने कल्पकतेने बाजू सावरली आणि परस्पर विरोधी रंगाच्या उंटाच्या साहाय्याने डाव बरोबरीत सोडविण्यात यश मिळवले. अन्य लढतीत महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तामिळनाडूच्या रक्षिता रवीने महाराष्ट्राच्या श्रुती काळेचा पराभव करून 1गुण प्राप्त केला. 17 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय विजेती महाराष्ट्राची भाग्यश्री पाटीलने केरळच्या आर्या मल्लारवर विजय मिळवत विजयी सलामी दिली.
मुलांच्या खुल्या गटात तामिळनाडूच्या आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल व्ही एस, आयएम अविनाश रमेश, आयएम मनीष अँटो क्रिस्तियानो, एफएम आयुष रविकुमार, एफएम मोहम्मद अनीस एम, पुद्दुचेरीच्या श्रीहरी एल, महाराष्ट्राच्या ऋत्विक कृष्णन व आर्यन सिंगला, राजस्थानच्या यश भराडिया, मध्यप्रदेशच्या फिडेमास्टर आयुष शर्मा, आसामच्या सीएम मयंक चक्रवर्ती, दिल्लीच्या हृदय पांचाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून 1 गुणांची कमाई केली.
स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचे क्रीडा उपसंचालक नवनाथ फरतडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, उपाध्यक्ष पुरषोत्तम भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे सहसचिव निरंजन गोडबोले, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर देबाशिष बरुआ आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: खुला गट(मुले): व्हाईट व ब्लॅक या नुसार:
आयएम राहुल व्ही एस(तामिळनाडू)(1गुण)वि.वि.प्रथमेश गावडे(महा)(0गुण);
सिद्धांत नाथ झा(हरियाणा)(0गुण) पराभूत वि.आयएम अविनाश रमेश(तामिळनाडू)(1गुण);
श्रीहरी एल(पुद्दूचेरी)(1गुण) वि.वि.गिरीधर ए(केरळ)(0गुण);
श्लोक शरणार्थी (महा)(0गुण) पराभूत वि.एफएम मोहम्मद अनीस एम(तामिळनाडू)(1गुण);
यश भराडिया(राजस्थान)(1गुण)वि.वि.मोहम्मद तबसीर आलम(बिहार)(0गुण);
अनिश गोडसे(महा)(0गुण) पराभूत वि.आयएम मनीष अँटो क्रिस्तियानो(तामिळनाडू)(1गुण);
एफएम आयुष शर्मा(मध्यप्रदेश)(1गुण)वि.वि.माधवेंद्र शर्मा(मध्यप्रदेश)(0गुण);
अभिजय दंडवते(महा)(0गुण)पराभूत वि.आलेकय मुखोपाध्याय(पश्चिम बंगाल)(1गुण);
एजीएम विघ्नेश बी(तामिळनाडू)(1गुण)वि.वि.दर्श शेट्टी(महा)(0गुण);
आर्यन सिंगला(महा)(1गुण)वि.वि.अथर्व जायल(महा)(0गुण);
एफएम आयुष रविकुमार(तामिळनाडू)(1गुण)वि.वि.भुमीनाथन ललितादिताय्यानार(महा)(0गुण);
माज्जी रामचरण तेजा(आंध्रप्रदेश)(0गुण)पराभूत वि.ऋत्विक कृष्णन(महा)(1गुण);
सीएम कार्तिक साई सीएच(तेलंगणा)(0.5गुण)बरोबरी वि.युवराज सिंग(पंजाब)(0.5गुण);
निखिल चेहल(पंजाब)(0 गुण)पराभूत वि. सीएम मयंक चक्रवर्ती(आसाम)(1गुण) ;
हृदय पांचाल(दिल्ली)(1गुण)वि.वि.निशांत डिसूझा(कर्नाटक)(0गुण);
मुली:
डब्ल्यूआयएम रक्षिता रवी(तामिळनाडू)(1गुण)वि.वि.श्रुती काळे(महा)(0गुण);
ईश्वरी जगदाळे(महा)(0.5गुण) बरोबरी वि.डब्ल्यूआयएम बोमिनी मौनिका अक्षया(आंध्रप्रदेश)(0.5गुण);
डब्लूएफएम ज्योत्स्ना एल(तामिळनाडू)(1गुण)वि.वि.मनसा(कर्नाटक)(0गुण);
सूर्यांशी शर्मा(हिमाचल प्रदेश)(0गुण)पराभूत वि.सरयू वेलपुला(तेलंगणा)(1गुण);
डब्ल्यूएफएम भाग्यश्री पाटील(महा)(1गुण)वि.वि.आर्य मल्लार(केरळ)(0गुण);
रिंधिया व्ही(तामिळनाडू)(0.5गुण)बरोबरी वि. दिशा यूए(कर्नाटक)(0.5गुण);
एएफएम हिमा तेजस्विनी गोडेटी(आंध्रप्रदेश)(1गुण)वि.वि.सिया सागर(गुजरात)(0गुण);
आध्या जैन(दिल्ली)(0गुण)पराभूत वि.तनिशा बोरामणीकर(महा)(1गुण);
डब्ल्यूसीएम किर्थि गांता(तेलंगणा)(0.5गुण)बरोबरी वि.दिव्या(कर्नाटक)(0.5गुण).
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा