पुणे, 7 ऑक्टोबर 2023: आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत विशाल विष्णू, प्रसनजीत पॉल, आदित्य कानिटकर यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 30 वर्षांवरील गटात पहिल्या फेरीत विशाल विष्णूने प्रशांत थानवीचा 6-0, 6-1 असा तर, हर्षवर्धन खुर्दने अजिंक्य पाटणकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रसनजीत पॉलने चांद शेखवर 6-4, 6-2 असा विजय मिळवला. स्पर्धेचे उदघाटन आर्यन पंप्सचे संचालक सुभाष सुतार, प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, पीएमडीटीएचे सहसचिव हिमांशू गोसावी, स्पर्धा संचालक डीएस रामा राव आणि आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Victory salute of Vishal Vishnu, Prasanjit Paul, Aditya Kanitkar at MT ITF S400 Senior Tennis Championship)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 30 वर्षांवरील गट: पहिली फेरी:
विशाल विष्णू (भारत) वि.वि.प्रशांत थानवी (भारत) 6-0, 6-1;
हर्षवर्धन खुर्द (भारत)वि.वि.अजिंक्य पाटणकर (भारत) 6-2, 6-3;
प्रसनजीत पॉल (भारत)वि.वि.चांद शेख (भारत) 6-4, 6-2;
शिलादित्य बॅनर्जी (भारत)वि.वि.अनिकेत जगताप (भारत) 6-1, 6-3;
35 वर्षांवरील गट: पहिली फेरी:
अमित मेटे (भारत)वि.वि.ब्रुमिक्स सुब्रमण्यन (भारत) 4-6, 6-1, 10-9;
अमित दीक्षित (भारत)वि.वि.पंकज चड्डा(भारत) 6-3, 6-1;
५० वर्षांवरील गट:
किरण बेमरकर (भारत)वि.वि.राजकुमार बेहरा (भारत) 7-5, 6-4;
राजेश नायर (भारत)वि.वि.सुरेंद्रन कांडत(भारत)6-1,6-3;
आशीष मालपाणी (भारत) [8]वि.वि.नितीन फडतरे (भारत) 6-2, 6-1;
पंकज यादव (भारत)वि.वि.रॉय डिसूझा (भारत) 6-1, 6-4;
जयप्रकाश निषाद (भारत) [7]वि.वि.जयंत येवले (ग्रेट ब्रिटन) 4-6, 7-5, 10-5;
शिवाजी यादव (भारत)वि.वि.गणेश जोशी (भारत) 6-0, 6-1;
40 वर्षांवरील गट: पहिली फेरी:
सागर कोगेकर (ऑस्ट्रेलिया)वि.वि.रोहित वले (भारत) 6-4, 6-0;
आदित्य कानिटकर (भारत)वि.वि.डॉ राहुल कोठारी (भारत) 6-2, 6-0;
अमेय पुराणिक (भारत)वि.वि.ऋषद सोमजी (भारत) 6-1, 6-1;
आकाश काळे (भारत)वि.वि.आदित्य अभ्यंकर (भारत) 6-2, 6-1;
विकास शिगवान (भारत)वि.वि.संदीप बेडेकर (भारत) 6-1, 6-2;
कौस्तुभ देशमुख (भारत)वि.वि. रोहन नाईक (भारत) 6-2, 6-1;