भारतीय पुरुष क्रिकेट संघाने गुरूवारी (१७ सप्टेंबर) अफगाणिस्तानला तिसऱ्या टी२० सामन्यात १२७ धावांनी पराभूत केले आणि एक अनोखा विश्वविक्रम रचला. दिल्लीत खेळली गेलेली ही मालिका भारताने ३-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी १०८ धावांची खेळी करत इतिहास रचला.
अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारत १२७ धावांनी जिंकला. पुरुष टी२० क्रिकेटमध्ये भारताची १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना जिंकण्याची ही १० वी वेळ आहे. पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये भारत या विक्रमामध्ये आघाडीवर आहे. तसेच एकूण विक्रमांच्या बाबतीत कॅनडाने भारतासारखीच कामगिरी केली आहे. त्यांनीही १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या फरकाने १० सामने जिंकले आहेत.
पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामने जिंकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झिम्बाब्वे आहे. त्यांनी ८ वेळा ही कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडने प्रत्येकी सहा वेळा ही कामगिरी केली.
पुरुष टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० किंवा अधिक धावांनी सर्वाधिक वेळा विजय मिळवणारे संघ
१० – कॅनडा, भारत
९ – ऑस्ट्रिया
८ – झिम्बाब्वे, नेपाळ, जपान, मलेशिया, युगांडा
६ – स्पेन, टांझानिया, पाकिस्तान, इंग्लंड, डेन्मार्क
५ – पीएनजी.
(पूर्ण सदस्य संघ ठळक अक्षरात दर्शविले आहेत)
सामन्याची स्थिती पाहिली, तर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच विकेटसाठी अभिषेक- संजू सॅमसनने १४२ धावांची भलीमोठी भागीदारी रचली. संजू ५० धावा, तर अभिषेक १०८ धावा करत बाद झाले. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने या दोघांनंतर सर्वाधिक २९ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकांत ७ विकेट्स गमावत २२१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान अफगाणिस्तानने चांगली सुरूवात केली होती, मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यांची मोठी भागीदारी सलामीलाच आली. इब्राहिम झद्रान आणि रहमानुल्लाह गुरबाजने ३१ धावांची भागीदारी केली. त्यांचे ३ फलंदाज शून्यावर तर चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. यावरून भारताची गोलंदाजी किती जबरदस्त झाली, हे दिसते.
गोलंदाजीमध्ये भारताकडून नितीश कुमार रेड्डी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने दोन, तर जसप्रीत बुमराह आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






