इंदोर । दिल्ली विरुद्ध विदर्भ यांच्यात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी २०१७च्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाला २५२ धावांची मोठी आघाडी मिळालीआहे. विदर्भ या सामन्यात पहिल्या डावात ५४७ धावांवर सर्वबाद झाला.
विदर्भाकडून पहिल्या डावात अक्षय वाडकरने १३३ तर आदित्य सरवटेने ७९ धावा केल्या. सिद्धार्थ नेरळनेही या सामन्यात ७४ धावा केल्या.
सामन्याचे दोन दिवस बाकी असून विदर्भाला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी विजेतेपदाची मोठी संधी आहे.