क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने अनेक गमतीदार घटना आपल्याला पाहायला मिळत असतात. खेळाडूंकडूनही अनेकदा अशा काही चुका होतात,. ज्या अगदी टाळता येण्यासारख्या असतात. या चुकांमुळे संघाला नुकसानही सोसावे लागते. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये अशीच एक घटना घडली, ज्यामुळे संघाला अतिरिक्त धावा मिळाल्या. त्या घटनेचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणि मिळाल्या फुकटच्या धावा
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ओव्हल येथे सरे विरुद्ध वॉर्विकशायर असा सामना खेळला जात आहे. या सामन्यात सरे संघाचा अष्टपैलू रियान पटेल यांच्याकडून एक अक्षम्य चूक झाली. पटेल गोलंदाजी करत असताना त्याने टाकलेला चेंडू विरोधी संघाच्या फलंदाजाने तटवला. हा चेंडू थेट गोलंदाज पटेलच्या हाती गेला. मात्र, त्यानंतर जे घडले ते केवळ हास्यास्पद होते.
https://www.instagram.com/reel/CghXMzAIJYC/?igshid=YmMyMTA2M2Y=
पटेलने हा चेंडू हातात घेत यष्टीरक्षक बेन फोक्सकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हा चेंडू इतक्या वेगात फेकला की, तो फोक्सच्या डोक्यावरून थेट सीमापार चौकारासाठी गेला. या कृतीनंतर स्वतः पटेल आणि फोक्स पूर्णपणे हताश दिसले.
या सामन्याचा विचार करायला गेल्यास वॉर्विकशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा बनवल्या होत्या. याच्या प्रतिउत्तरात सरेने ओली पोपच्या अर्धशतकाच्या जोरावर ३१६ धावा बनवत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. वॉर्विकशायरने दुसऱ्या डावामध्ये ३१० धावा बनवल्या. त्यामुळे सरे संघाला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान मिळाले आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा सरे संघाने धावांचा पाठलाग करताना एक बाद ८७ धावा बनवलेल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी
CWG 2022: बर्मिंघममधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी चिंतेची बातमी; पदकाची दावेदार कोरोनाबाधित?






