टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. ज्या संघाकडून विजेतेपदाची अपेक्षा होती त्यातील काही संघ तर उपांत्य फेरीतही पोहोचले नाही आणि जे पोहचले त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा या गोंधळामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ लकी ठरला असेच म्हणावा लागले. कारण यांनी स्पर्धेचा पहिलाच सामना गमावला नंतर त्यांना झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. असे सर्व सुरू असताना त्यांनी थेट उपांत्य फेरीत धडक मारली आणि ‘डेंझर’ न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत पोहोचण्याचा पहिला मान मिळवला. तेव्हा त्यांच्या कामगिरीने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना देखील आनंद झाला. तो पण एवढा की त्यांनी थेट स्टुडिओमध्येच नाचायला सुरूवात केली. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.
पाकिस्तानचे दिग्गज वकार युनूस आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी चर्चा सत्राच्या स्टुडिओमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर नाचायला सुरूवात केली. त्यांना वसीम अक्रम आणि मिस्बाह उल हक यांनीही चांगली साथ दिली. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने त्यांच्या डान्सचा व्हिडिओ ट्वीट केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना रंगला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी डॅरिल मिचेल याच्या नाबाद 53 आणि कर्णधार केन विल्यमसन याच्या 46 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 152 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना स्पर्धेत शांत असलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची बॅट तळपली. त्याने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेले.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ट्रेंट बोल्ट आणि लोकी फर्ग्युसन यांचा चांगलाच समाचार घेतला. कारण बाबर बाद झाल्यावर मोहम्मद रिझवान- तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोहम्मद हॅरीस सोबत धावफलक हलता ठेवला. रिझवानने 57 धावांची खेळी केली, तर हॅरीसने 26 चेंडूत 30 धावा केल्या. After Pakistan’s win, Shoaib Malik-Waqar Younis dance in the studio, video goes viral
Every Pakistani today. pic.twitter.com/mX3nTynpjv
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 9, 2022
पाकिस्तानने 2009मध्ये टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्यांचा या स्पर्धेतील प्रवास उल्लेखनीय ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकार परीषदेत रोहितचा गौप्यस्फोट, विराट नाही तर ‘हा’ फलंदाज त्याच्या मर्जीने खेळतो
टी20मध्ये सर्वाधिक शतके, 14 अर्धशतके; इंग्लंडविरुद्ध भारताने पाडला धावांचा पाऊस, जाणून घ्या अव्वल कोण?