---Advertisement---

RCB च्या विजयानंतरचा व्हिडिओ गायब, सिद्धार्थ मल्ल्याचा संताप अनावर! जाणून घ्या कारण

On: बुधवार, जून 11, 2025 6:56 PM
---Advertisement---

18 वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स (Royal challengers bengluru) बंगळुरूने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. रजत पाटीदारच्या (Rajat patidar) नेतृत्वाखाली टीम आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा (Punjab king’s) 6 धावांनी पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. पहिल्या हंगामापासून आरसीबीकडून खेळणाऱ्या विराट कोहलीसाठी (Virat Kohli) ही पहिली आयपीएल ट्रॉफी होती. त्यामुळेच देशभरात खूप उत्साह आज जल्लोष होता. आरसीबी संघाचे माजी मालक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थनेही या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला होता पण तो इंस्टाग्रामने डिलीट केला.

आरसीबीच्या (RCB) विजयानंतर विजय मल्ल्याने सामन्याच्या शेवटच्या क्षणांचे काही व्हिडिओ शेअर केले. ज्यामध्ये तो टीव्ही पाहत आहे आणि शेवटचा चेंडू टाकला जात आहे. विजय मल्ल्या आनंदाने रडू लागतात. त्याचे अश्रू थांबले नाहीत. परंतु हा व्हिडिओ काढून टाकल्यानंतर, इंस्टाग्रामने सिद्धार्थचे अकाउंट काही दिवसांसाठी बॅन केले जेणेकरून तो त्याच्या फॉलोअर्सशी बोलू शकणार नाही.

सिद्धार्थ मल्ल्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील बंदी उठवण्यात येताच, त्याने एक व्हिडिओ शेअर करून आपला राग व्यक्त केला. तो म्हणाला, “आरसीबीच्या विजयानंतर मी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. तो अनेकांना आवडला. पण इंस्टाग्रामने तो व्हिडिओ डिलीट केला आणि मला माझ्या फॉलोअर्सशी बोलण्यास बंदी घातली. त्यांनी आरोप केला की तो कॉपीराइट धोरणाचे उल्लंघन करतो, तर त्यात फक्त सामन्याचे दृश्ये पार्श्वभूमीत प्ले होत आहेत. हे पूर्णपणे हास्यास्पद आहे.”

सिद्धार्थने बीसीसीआय आणि आयपीएलवर या ऐतिहासिक क्षणाला हिरावून घेतल्याचा आरोप केला. सुरुवातीच्या हंगामात सिद्धार्थ आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक सामन्यात स्टेडियममध्ये येत असे. पण बँक घोटाळ्याच्या आरोपांनंतर विजय मल्ल्या त्याच्या कुटुंबासह भारतातून पळून गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---